शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

World Environment Day 2023:'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' म्हणत तुकोबारायांनीदेखील पटवून दिले आहे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 10:45 AM

World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिन ५ जून १९७३ पासून सुरु झाला, मात्र तुकोबारायांनी हा संस्कार १७ व्या शतकात घालून दिला, याचा अभिमान बाळगायला हवा!

लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु, वृक्षवल्ली अन्य कोणी नसून आपलेच सोयरे म्हणजे नातेवाईक आहेत, ही जाणीव आमच्या संतांनी, संस्कृतीने फार आधीपासूनच आमच्या मनात खोलवर रुजवली आहेत. म्हणूनच तुळशीची पूजा, शंकराला बेल, वडाला प्रदक्षिणा, मंगलकार्यात केळीचे खांब, जेवणानंतर गोविंदविडा इ. वृक्षवल्ली अर्थात पर्यावरणाशी निगडित गोष्टी आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत. 

आपल्या संस्कृतीने नदीला पावित्र्य, पृथ्वीला मातृत्त्व, निसर्गाला पितृत्त्व, डोंगरदNयांना बंधुत्त्व बहाल करून मानवाची नाळ निसर्गाशी जोडलेली आहे. मातीतून जन्माला येत, मातीतच आपण मिसळणार आहोत याची जाणीव दिली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विचार आपल्या मनात असतोच, फक्त त्याला खतपाणी घालण्यासाठी आजच्या दिवसाचे औचित्य!

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज तर अशा विशेष दिनाची वाट न पाहता वृक्षवल्लींशी थेट घरोबा करतात. शेवटी तेही संसारी माणूसच. संसारी व्यक्ती नातीगोती, प्रपंच, गणगोत याशिवाय राहू शकत नाही. परंतु संतांचा संसारही वेगळा. विषयासक्त नसलेला. म्हणून तर ते निसर्गाशी सोयरिक जोडून म्हणत आहेत,

वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे,पक्षीही सुस्वरे आळविती।

नातेवाईक म्हटले की रुसवे फुगवे , कुरबुरी, राग मत्सर या गोष्टी आल्याच. परंतु तुकोबा रायांचे नातेवाईक सुस्वरात गातात, बोलतात, आनंदाने जगतात व दुसऱ्यांनाही आनंदाने जगायला शिकवतात. 

येणे सुखे रूचे एकान्ताचा वास,नाही गुणदोष अंगा येत।

त्यांच्या सान्निध्यात येण्याने कपाळावर आठ्या येत नाहीत, तर सुखांताचा सहवास लाभतो. त्यांच्याशी बोलून मन रिते होते. गुणदोष अंगाला लागत नाहीत, उलट आत्मानंदाची अनुभूती होते.

आकाश मंडप पृथुवी आसन,रमे तेथे मन क्रिडा करी।

या नातेवाईकांची श्रीमंती तर पहा, आकाश मंडप आणि पृथ्वी आसन आहे. भव्य-दीव्य महालच जणू. परंतु या श्रीमंतीचे मनावर दडपण येत नाही, उलट मन तिथे रमते, मुक्त होते.

कंथाकमंडलु देहउपचारा,जाणवितो वारा अवसरू।

निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपल्या नेमक्या गरजा किती याची जाणीव होते. देहरक्षणापुरते कपडे आणि देहउपचाराकरिता पाण्याचा कमंडलू. बाकी गरजांची आठवणही होत नाही. वेळ-काळ याची भान राहत नाही. पण वाहता वारा आणि निसर्गाचे चक्र वेळेचे भान करून देतो.

हरिकथा भोजन परवडी विस्तार,करोनि प्रकार सेवो रुचि।

या नातेवाईकांच्या गोतावळ्यात गेलो, की तहान भूक हरपून जाते. वृक्षवेली, वनचरे हरिकथा हेच भोजन म्हणून सेवन करतात आणि त्यांच्यामुळे आम्हालाही हरिकथेचे विविध प्रकार रुचकर वाटू लागतात.

तुका म्हणे होय मनासि संवाद,आपुलाचि वाद आपणांसि।

आजही मानसिक स्वास्थ्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, हवापालट करा, असा वैद्यकिय सल्ला दिला जातो. काळापुढे जाऊन तुकाराम महाराज हेच पथ्य पाळायला सांगत आहेत. निसर्ग आपल्याशी बोलत नाही पण आपणच आपल्याशी संवाद साधायला शिकवतो. त्या एकांतात आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. मन:शांती मिळत़े म्हणून प्रापंचिक नातेवाईकांबरोबर वृक्षवेलींशी सोयरिक जुळवून घ्या आणि दरदिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरा करा, हीच या अभंगाची फलश्रुती!

टॅग्स :World Environment DayWorld Environment Day