शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

योग साधना करताना पाणी का पिऊ नये?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 2:27 PM

जेव्हा तुम्ही योगाचा सराव करता, तेव्हा तुम्ही शरीरातले 'उष्ण' वाढवत असता. जर तुम्ही थंड पाणी प्यायले तर उष्ण वेगाने खाली येईल, आणि यामुळे इतर विविध प्रतिक्रिया उद्भवतील.

योग साधना करत असताना, शरीरात योग्य परिस्थिती राखण्याचे महत्त्व आणि सराव करत असताना पाणी का पिऊ नये, याबद्दल सद्गुरू पुढील लेखात सांगतात.प्रश्नकर्ता: नमस्कार सद्गुरू, आपण म्हणालात की योग सराव करताना पाणी पिऊ नये किंवा बाथरूमला जाऊ नये - असं का?

सद्‌गुरु: जेव्हा तुम्ही योगाचा सराव करता, तेव्हा तुम्ही शरीरातले 'उष्ण' वाढवत असता. जर तुम्ही थंड पाणी प्यायले तर उष्ण वेगाने खाली येईल, आणि यामुळे इतर विविध प्रतिक्रिया उद्भवतील. याने एलर्जी, अतिरिक्त म्युकस व अशा समस्यांची शक्यता वाढते. जर तुम्ही योगासनांचा एका विशिष्ठ तीव्रतेने सराव करीत असाल आणि अचानक थंड पाणी प्यायले तर तुम्हाला लगेच सर्दी होऊ शकते. आणि सरवादरम्यान बाथरूमला कधीही जाऊ नका कारण सराव करताना घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर गेले पाहिजे. हळूहळू या शरीराच्या सक्तीपूर्ण प्रवृत्ती कमी करण्याचा विचार आहे जेणेकरुन एक दिवस जर तुम्ही स्वस्थ बसलात तर तुम्ही स्वतः योगस्वरूप बनाल - केवळ योगाचा सराव करणे नाही.

हळू हळू, जसे तुम्ही सराव करता तसा तुमचा हा योग तुमच्यात आकार घेतो. जर तुम्ही काही आसने केली तर तुमच्या डोक्याच्या वरच्या भागातून घाम यायला हवा- संपूर्ण शरीरावर नाही.बाकी शरीराला हवामानाच्या परिस्थितीनुसार घाम फुटू शकतो, परंतु मुख्य घाम तुमच्या डोक्यातून यायला हवा. याचा अर्थ तुम्ही तुमची उर्जा योग्य दिशेने निर्देशित करीत आहात आणि आसने केल्याने ते नैसर्गिकरित्या होईल. अंतिम लक्ष्य हे तुमचं डोकं हे एका सर्वस्वी वेगळ्या तत्वाचे कारंजे व्हायला हवे , जेणेकरुन आपण प्रथम खराब पाण्याने सराव करा. जर तुम्ही तुमच्यातले उष्ण वर ढकलंत ठेवले तर स्वाभाविकच खराब पाणी वरच्या दिशेला जाईल. जर तुमची शरीरयंत्रणा खूपच गरम झाली तर थोड्याशा शवासनाने शांत करा, परंतु थंड पाण्याने उष्णता कमी करू नका. बाथरूममध्ये जाण्याऐवजी ते घामाच्या स्वरूपात बाहेर गेले पाहिजे त्या मार्गाने शरीरातील शुद्धीकरणाची प्रक्रिया कितीतरी प्रभावी बनते.

सरावाच्या वेळी, जर तुम्हाला खूप घाम येत असेल, तर सहसा तुमचे कपडे त्याने भिजतील. पण जर आपण उघड्या अंगाने असाल, तर नेहमी घाम परत शरीरात चोळून जिरवावा, कारण त्यामध्ये आंतरिक प्राणाचा एक अंश असतो जो आपल्याला हरवायचा नाहीये. जेव्हा आपण घाम पुन्हा शरीरात जिरवतो तेव्हा आपल्या शरीरात एक विशिष्ट वलय आणि शक्ती निर्माण होते -आपल्या स्वतःच्या ऊर्जेचा एक कोश - ज्याला कवच देखील म्हणता येईल, आपल्याला हे शरीरा बाहेर घालवायचे नाही. योग हा शरीराचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आहे. जर आपण नियमितपणे आसने केली, आणि आपण आपला घाम परत शरीरामध्ये जिरवला तर आपण काही प्रमाणात उष्ण निर्माण करत आहे आणि प्राण अधिक प्रखर करत आहे. गरम हवामान, थंड हवामान, भूक, तहान - या सर्वांपासून तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हाल असे नाही - परंतु या गोष्टी आपल्याला जास्त त्रास देखिल देणार नाहीत.