शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याच्या यशाशी तुलना करताना त्याने किती घाव सोसले ते आवर्जून बघा; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 08:00 IST

तुलना करायचीच असेल तर दुसऱ्याच्या सुखाशी करू नका, दुःखाशी करा, म्हणजे आपण किती सुखी आहोत हे लक्षात येईल.

त्रास प्रत्येकाला होत असतो. परंतु, कोणाची सहनशक्ती जास्त असते, तर कोणाची कमी. जो सहनशक्ती वाढवतो, तोच घडत जातो. म्हणूनच मराठीत वाक्प्रचार  आहे, 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.' आपण दुसऱ्याच्या यशाशी तुलना करताना त्याने केलेले प्रयत्न, बाळगलेला संयम विसरून जातो. परंतु कोणतीही यशोगाथा सहजासहजी घडत नसते. म्हणून त्या यशोगाथेचा प्रवास समजून घ्या. 

एका मोठ्या शहराच्या मधोमध एक नामांकित वस्तुसंग्रहालय होते. त्या शहरातूनच नाही, तर जगभरातले पर्यटक त्या वस्तुसंग्रहालयाला भेट देत असत. संगमरवरी फरशीने आणि आरशांनी सजावट केलेले ते पांढरेशुभ्र वस्तुसंग्रहालय एखाद्या महालासारखे भव्य दिव्य वाटत असे. दर दिवशी हजारो लोक तिथे येत, तिथल्या वस्तुंचे कौतुक करत, फोटो काढत, भरभरून वर्णन करत. त्या संग्रहालयातली एक संगमरवरी मूर्ती सर्वांना आकर्षून घेत असे. खरे पाहता, त्या मूर्तीला पाहण्यासाठीच पर्यटकांची झुंबड होत असे. 

एके रात्री, ती मूर्ती सजीव झाली आणि बोलू लागली. तिच्या आवाजाने वस्तूसंग्रहालयाची पायरीसुद्धा बोलू लागली. दोघींमध्ये बराच वेळ संवाद झाला. शेवटी जाता जाता पायरीने आपले शल्य बोलून दाखवले. ती म्हणाली,

'तू आणि मी काही वेगळे नाही. आपण दोघी एकाच खाणीतून निघालो, एकाच हत्याराचे घाव होऊन, तोडमोड होत, एकाच ट्रकमधून इथवर आलो. परंतु, तुला मान मिळाला मूर्तीचा आणि मला मान मिळाला पायरीचा...! ही बाब मनाला अतिशय टोचत होती, तीच बोलून दाखवली. एकाच जातकुळीच्या असूनही लोक मला तुडवून जातात आणि तुला डोळेभरून पाहतात, हे सहन होत नाही.'

यावर मूर्ती म्हणाली, `बरे झाले बोललीस. पण थोडा मागचा काळ आठवून पहा. इथे पोहोचेपर्यंत तू म्हणालीस त्याप्रमाणे दोघींचा प्रवास सारखाच झाला. परंतु नंतर, इथल्या शिल्पकाराने मूर्ती घडवण्यासाठी आधी तुझी निवड केली, तेव्हा छिन्नीचे काही घाव पडताच, तुझे तुकडे पडले. तेव्हा तू आणखी थोडी सहनशक्ती दाखवली असतीस, तर आज माझ्या जागी तू असतील. मी मात्र, ते घाव सहन केले. संयम राखला आणि आज लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले.'

या गोष्टीतून आपल्या लक्षात येईल, की आपल्याही बाबतीत हेच घडते. अथक प्रयत्न करूनसुद्धा थोडक्यासाठी संयम गमावून बसतो. ज्या दगडावर सर्वात जास्त घाव पडतात, तीच मूर्ती जास्त रेखीव बनते. म्हणून, तुमच्या वाट्याला अनेक प्रकारची संकटे आली, तरी डगमगून जाऊ नका. संकटे म्हणजे छिन्नीचे घाव आहेत. तुमच्या आयुष्यातला अनावश्यक भाग छाटला जातोय, याचा आनंद बाळगा. अन्याय सहन करू नका, पण प्रसंगी अपमान पचवण्याची ताकद ठेवा. याच गोष्टी उद्या तुम्हाला केवळ मॉडेल नाही, तर `रोल मॉडेल' बनवणार आहेत. 

आता तुम्हीच ओळखा, आपली योग्यता 'पायरी' बनण्याची आहे, की 'मूर्ती'?

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी