शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
2
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
3
पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान झाली आई; पण बाळ कुणाचं? साहिलनेही विचारला प्रश्न
4
इन्फोसिस-एसबीआयसह 'हे' ५ शेअर्स करणार मोठी कमाई; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
5
IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...
6
ipad Air: ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...
7
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
8
Champashashthi 2025: २६ नोव्हेंबर चंपाषष्ठी, खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता; 'अशी' करा पूजा!
9
इथिओपियाहून भारतात आलेले राखेचे ढग कधी कमी होणार? या शहरांवर परिणाम होणार, हवामान विभागाने दिली माहिती
10
मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
11
३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा 'ही' आर्थिक कामं, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं
12
MNS: राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला गाठलं आणि रस्त्यावरच...
13
Mumbai: दुचाकीस्वाराचं अपहरण करून लैंगिक सुखाची मागणी; वांद्रे पोलिसांकडून ऑडीचालकाला अटक
14
"डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ
15
Gautam Gambhir: गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या नावावर 'या' ५ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
16
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार ही मराठी अभिनेत्री? तेलुगु सिनेमात केलंय काम, प्रोमोमुळे चर्चेला उधाण
17
आता Apple नं घेतला कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय; 'या' ५ कारणांमुळे कंपनीनं केली घोषणा
18
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष
19
Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार!
20
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2025 Date: दिवाळी कधीपासून होणार सुरू? धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज शुभ योगात

By देवेश फडके | Updated: October 16, 2025 17:55 IST

Diwali 2025 Date: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये दिवाळीला अनन्य साधारण महत्त्व आहे. संपूर्ण देशात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या सणाचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते.

Diwali 2025 Date: चातुर्मास काळातील अनेकार्थाने महत्त्वाचा मानला गेलेला सण-उत्सव म्हणजे दिवाळी. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये दिवाळीला अनन्य साधारण महत्त्व आहे. संपूर्ण देशात दिवाळी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस काही ना काही महत्त्व असून, या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक व सामाजिक महत्त्व आले आहे. दिवाळी दीपोत्सव कधीपासून सुरू होणार? कोणते सण कधी आहेत? जाणून घेऊया...

सन २०२५ मध्ये शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ ते गुरुवार, २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दिवाळी आहे. यंदा दिवाळीला विविध शुभ योग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक व सामाजिक महत्त्व आले आहे. यावेळी नवे धान्य तयार झालेले असते, म्हणून हा कृषिविषयक आंनदोत्सवही आहे. दिवाळीच्या पाचही दिवसांचे माहात्म्य सांगणाऱ्‍या अनेक कथा पुराणांत आलेल्या आहेत. दिवाळीच्या प्रत्येक सणांचे महात्म्य, महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया...

दिवाळीतील सणांची माहिती (Diwali 2025 Date)

- गोवत्स द्वादशी वसुबारस (Vasubaras Diwali 2025): शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी रमा एकादशी झाल्यानंतर गोवत्स द्वादशी, वसुबारस आहे. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी अश्विन वद्य द्वादशी तिथीला गोवत्सद्वादशी असते. यास वसुबारस असेही म्हणतात. या दिवशी सुवासिनी सवत्स गाईची पूजा करतात. हा दिवसही दिवाळीचाच एक दिवस मानतात. 

- धनत्रयोदशी (Dhanteras Diwali 2025): शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी शनि प्रदोष असून, यमदीपदान केले जाणार आहे. याच दिवशी गुरुद्वादशी आहे. आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे. यमराजाने आपल्या दूतांना ‘या दिवशी जो दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार नाही’, असे सांगितल्याची कथा आहे. म्हणून या दिवशी मंगलस्नान करून दीप लावतात. यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावायचा असतो. 

- नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi Diwali 2025): सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी नरक चतुर्दशी आहे. याच दिवशी अभ्यंगस्नान असणार आहे. तसेच सोमवती अमावास्या योगही जुळून येत आहे. या दिवशी दुपारी ०३ वाजून ४४ मिनिटांनी अमावास्या प्रारंभ होणार आहे. आश्विन वद्य चतुर्दशीस नकरचतुर्दशी हे नाव आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. सत्यभामेने श्रीकृष्णाच्या साहाय्याने नरकासुराला मारले अशीही एक कथा आहे. 

- लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan Diwali 2025): मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन अमावास्येला लक्ष्मी पूजन आहे. सायंकाळी ०५ वाजून ५४ मिनिटांनी अमावास्या समाप्त होत आहे. लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त सायंकाळी ०६ वाजून १० मिनिटे ते रात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे असा आहे. या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतीक आहे. संयमपूर्वक धन संपादन केले, तर मनुष्याचे कल्याण होते. यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते. 

- अश्विन अमावास्येला लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, मांगल्य, प्रकाश आढळेल, तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्याची रोषणाई करतात. घरातील कचरा घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुणी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची चाल काही ठिकाणी आहे.

- दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा (Diwali Padwa 2025): बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा आहे. या दिवशी कार्तिक मासारंभ होणार असून, गोवर्धन पूजन केले जाणार आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हे नाव आहे. या दिवशी विष्णूने वामनावतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटले. या दिवशी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, असा वामनाने बळीला वर दिला. या दिवशी बलिपूजा करण्याचीही पद्धत आहे. 

- कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून विक्रम संवत सुरू होतो. म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. हा दिवाळीचा मुख्य दिवस मानतात.

- भाऊबीज (Bhaubeej Diwali 2025): गुरुवार, २३ ऑक्टोबर २०२५ रोजी भाऊबीज आहे. सौर हेमंत ऋतू सुरू होणार असून, हा दिवस यमद्वितीय म्हणूनही साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेचे भाऊबीज हे नाव आहे. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला तेव्हा तिने त्याला ओवाळले आणि आनंद व्यक्त केला. तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची चाल रूढ झाली, असे मानले जाते.

भारतभर दिवाळीबाबत अनेकविध लोकाचार (Significance Of Diwali 2025 In Marathi)

भारताच्या निरनिराळ्या भागांत दिवाळीसंबंधी भिन्न-भिन्न लोकाचार दिसून येतात. दिवाळीचा सण विशेष महत्त्वाचा असल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीत घरांवर आकाशदिवे लावतात. त्यामुळे शिव, विष्णू, यम इ. देव संतुष्ट होऊन संपत्ती देतात, असे पुराणांत सांगितले आहे. निरनिराळी मिष्टान्ने व फराळाचे पदार्थ करून त्यांचा देवांना नैवेद्य दाखवितात व आप्तजन आणि इष्टमित्र यांना फराळासाठी बोलावितात. फटाके उडवून सर्वजण या उत्सवाचा आनंद लुटतात. 

दिवाळीत विविध रंगीत आकाशदिवे लावण्याची प्रथा (Rituals Traditions Of Diwali 2025 In Marathi)

दिवाळीत विविध रंगीत आकाशदिवे लावण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून मुले मातीचे किल्ले करतात. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवसांत. त्या वेळी अयोध्येतल्या प्रजेने दीपोत्सव केला आणि तेव्हापासून हा उत्सव दर वर्षी सुरू झाला. दिवाळीच्या उगमासंबंधी ऐतिहासिक कल्पना अशी आहे की, सम्राट अशोक यांच्या दिग्विजयाप्रित्यर्थ हा महोत्सव सुरू झाला. दुसरी कल्पना अशी की, सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव करण्यात आला, तोच पुढे दर वर्षी साजरा करण्याची प्रथा पडली. भारतीय वाङ्मयात दीपावलीचे उल्लेख अनेक भिन्न-भिन्न नावांनी आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali 2025: Dates, significance, and celebrations of the festival of lights.

Web Summary : Diwali 2025 spans October 17th to 23rd, featuring Vasubaras, Dhanteras, Narak Chaturdashi, Lakshmi Pujan, Padwa, and Bhaubeej. Each day holds unique significance, rooted in mythology and tradition, celebrated with lights, prayers, and festivities across India, marking new beginnings and prosperity.
टॅग्स :Diwaliदिवाळी २०२५Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीLaxmi Pujanलक्ष्मीपूजनspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सण