शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

'या' सात गोष्टी एकत्र येतात तेव्हा तयार होतं एक ‘सुंदर जीवनशिल्प’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 08:38 IST

आपलं जग आणखी थोडं मोठं होतं. नवी शाळा, मित्र, शिक्षक यांच्याशी जवळीक निर्माण होते. प्राथमिक नंतर मग माध्यमिक, असं टप्प्याटप्प्याने मोठे होत असतो.

- प्रल्हाद वामनराव पैमित्रांनो, यशस्वी जीवनशिल्प घडविण्यासाठी आवश्यक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या सद्गुरूंनी दिलेल्या दिव्यसंदेशाप्रमाणे खरं तर आपण आपलं जीवनशिल्प नकळतपणे घडवीत असतोच, पण जर ते जाणीवपूर्वक योग्य दिशेने घडवलं तर ते अधिक उत्तम आणि सुंदर असेल. त्यासाठी आवश्यक सात गोष्टींची ओळख सद्गुरूंनी आपल्याला करून दिली आहे.

१) मी स्वत: २) जीवनतत्त्व ३) शिल्पकलेचे ज्ञान ४) उपकरणे ५) इच्छा ६) कल्पकता आणि ७) प्रयत्न! ह्या सात गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक ‘सुंदर जीवनशिल्प’ आकाराला येत. त्यापैकी एकाचा जरी अभाव असला तरी हवं तसं शिल्प तयार होणार नाही. चला, तर प्रत्येक घटकाची ओळख करून घेऊया. जीवनशिल्पाचा पहिला घटक आहे ‘मी स्वत:!’ म्हणजे शिल्प कोण घडवणार असा प्रश्न विचारला तर उत्तर काय असेल? ‘मी’ घडवणार ! हा मी कोण बरं? आणि तो कसा काय घडला? मित्रांनो, आपण प्रथम बाळाच्या रूपात जन्माला आलो तेव्हा अगदी छोटेसे असतो. मग हळूहळू मोठे होऊ लागतो. आईचे बोट धरून चालायला शिकतो. बोलायला शिकतो. मग बालवाडीत, प्राथमिक शाळेत जातो.

आपलं जग आणखी थोडं मोठं होतं. नवी शाळा, मित्र, शिक्षक यांच्याशी जवळीक निर्माण होते. प्राथमिक नंतर मग माध्यमिक, असं टप्प्याटप्प्याने मोठे होत असतो. या प्रत्येक टप्प्यावर जे जे शिकतो, जाणून घेतो, ज्ञान मिळवतो अन् मोठे होत असतो, त्या सर्वांनी मिळून बनलेला तो ‘मी स्वत:!’ हा ‘मी’ म्हणजेच आपण एक व्यक्ती म्हणून आपलं स्वत:चं जीवनशिल्प घडविणार आहोत. आपलं स्वत:चं जीवनशिल्प घडविणारे शिल्पकारदेखील आपणच आहोत. ते सुंदररीत्या घडविण्यासाठी आपणच प्रयत्न करायचे आहेत! म्हणून ‘मी स्वत:’ या जीवनशिल्पाचा अत्यंत महत्त्वाचा असा पायाभूत घटक आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक