शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

ज्ञानियांचा राजा असलेल्या ज्ञानदेवांना जेव्हा राग आला, तेव्हा तो कोणी व कसा दूर केला, ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 16:47 IST

संतांच्या आयुष्यात काय कमी अडचणी होत्या? पण त्यांनी त्या अडचणींवर मात कशी केली हे वाचणे अधिक प्रेरणादायक ठरते.

सर्वसामान्य मनुष्यापेक्षा संतांचे आचरण वेगळे असले, तरीदेखील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या व्याधी त्यांनाही त्रास देत असत. मात्र त्यांच्या बाबतीतला राग-लोभ हा विषय सुखासाठी नाही तर जगाच्या कल्याणासाठी असे. आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातला उद्विग्न प्रसंग आणि त्यावर त्यांनी केलेली मात याचे शब्द चित्रण पाहू. जेणेकरून आपल्याही आयुष्यातील उद्विग्न प्रसंगातून बाहेर पडण्याचे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल. 

आपल्या गोड वाणीने अखिल जगाचा ताप दूर करणारे ज्ञानोबा माऊली एकदा रागावले. पण कशामुळे हे जाणून घेण्याआधीच त्यांनी रागारागात स्वतःला आपल्या छोट्याशा झोपडीत बंद करून ताटी अर्थात दार लावून घेतले. त्यावेळेस त्यांची धाकटी बहीण मुक्ता मोठ्या बहिणीसारखी समजूत काढत म्हणते, 

योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा।विश्व रागे झाले वन्ही, संते सुखे व्हावे पाणी।शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानाचा उपदेश।विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।

लटका राग धरण्याचे ते वय, मात्र परिस्थितीने अकाली आलेले प्रौढत्त्व, अशात समाजोद्धारासाठी निघालेली ही चार बालके. ती साधीसुधी बालके नव्हेत, हे तर साक्षात परब्रह्मच! निवृत्तीनाथ हे भगवान शंकर, श्रीज्ञानदेव हे भगवान महाविष्णू, सोपान म्हणजे ब्रह्मदेव आणि मुक्ता म्हणजे सर्व जगताची चिंता वाहणारी आदिमाया! 

ही विश्वरूपे आपेगावच्या विठ्ठलपंत आणि रुख्मिणी कुळकर्णी यांच्या उदरी जन्माला आली. संन्याशाची पोरे म्हणून हिणवली गेली. आई-वडिलांना समाजाने देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा सांगितल्यामुळे, चारही मुले बालवयातच पोरकी झाली. एकमेकांचा प्रेमाने सांभाळ करू लागली. समाजाने त्यांना वाळीत टाकले, तरी या चारही मुलांनी याच समाजाला आपल्या पदरात घेतले. 

मात्र, अशाच एका कठोर प्रसंगी, ज्ञानेश रागावले. भिक्षा मागण्यासाठी गावात गेले असता, त्यांना वाईट अनुभव आला. भिक्षा कुणीच घातली नाही, उलट अपशब्द सुनावले. ज्ञानाला फार वाईट वाटले. त्याने घरी येऊन झोपडीचे दार लावून घेतले. धाकटी मुक्ता आता समंजस झाली होती. नक्की काय घडले असेल, याची तिला कल्पना आली. तिने झोपडीच्या दारावर, अर्थात ताटीवर थाप मारून 'ज्ञाना दादा, ताटी उघड' अशी प्रेमळ साद घातली. 

८-९ वर्षाच्या मुक्तेचा कोमल आवाज ऐकून ज्ञानाला आणखीनच रडू कोसळले. त्याचे मुसमुसणे कानी येताच, मुक्ता म्हणाली, 

संत तेच जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी।लोभ अहंता न ये मना, जगी विरक्त तेचि जाणा।इहपरलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी।मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।

मुक्तेने माऊली होऊन, ज्ञानेश्वर माऊलीची समजूत काढली. त्यावेळेस जे अभंग गायले, तेच 'ताटीचे अभंग' म्हणून प्रसिद्ध आहेत. मुक्तेने केवळ झोपडीची ताटी उघड, असे ज्ञानेशाला सांगितले नाही, तर मनाची दारे उघड. क्षमाशील हो. लोकांचे बोलणे मनावर घेऊ नकोस. विरक्त हो. कोणाकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नकोस. या मायेत अडकून न राहता, निष्काम मनाने समाजोद्धाराचे काम करत राहा. संतांनी आई होऊन जगाचे अनंत अपराध पोटात घ्यायचे असतात. आपण उद्विग्न न होता, लोकांचा राग शांत करायचा असतो. लोकांनी अपशब्द काढले, तरी संतांनी शब्दसुमनांची परतफेड करायची असते. चांगले वागणारे आणि वाईटही वागणारे लोकही आपलेच. त्यांच्यात आप-परभाव करणे योग्य नाही. लोभ-अभिमानाचा स्पर्श मनाला होऊ देऊ नको, दादाऽऽऽ, ताटी उघडा ज्ञानेश्वरा....।

काय प्रसंग असेल तो, नुसत्या कल्पनेनेही मन व्याकुळ होते. मात्र इवलीशी मुक्ताई, ज्ञानियांच्या राजाची समजूत काढत म्हणते, 

तुम्ही तरुनि विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा!

मग, आपण आपल्या मनाच्या बंद केलेल्या ताटी कधी उघडणार???

टॅग्स :sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर