शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Jayanti 2026: गणेश जयंती अन् गणेश चतुर्थी यातील नेमका फरक माहिती आहे का? पुराण कथा वाचा, संभ्रम दूर करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 06:06 IST

Difference Between Shree Ganesh Jayanti And Ganesh Chaturthi 2026: अनेकांच्या मनात गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी याबाबत गोंधळ होतो. नेमका फरक आणि सविस्तर माहिती जाणून घ्या...

Difference Between Shree Ganesh Jayanti And Ganesh Chaturthi 2026: ॐ गं गणपतये नमो नम:... श्री सिध्धीविनायक नमो नम:... अष्टविनायक नमो नम:... गणपती बाप्पा मोरया... मराठी वर्षात गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. आपल्याकडे भाद्रपदातील गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची परंपरा आहे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. परंतु, गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी या दोन्हींमध्ये अनेकदा अनेकांची गल्लत होत असते. गणेश जयंती अन् गणेश चतुर्थी यातील नेमका फरक आणि पुराणातील कथा जाणून घेऊया...

गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! यंदा, गुरुवारी २२ जानेवारी २०२६ रोजी श्री गणेश जयंती आहे. 

२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख

गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमध्ये काय फरक आहे

माघ महिन्यात साजरी केली जाते ती श्री गणेश जयंती 

प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. परंतु, माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्रीगणेश जयंती, गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावांनाही ओळखले जाते. माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हटले जाते. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

भाद्रपद महिन्यात साजरी केली जाते ती श्री गणेश चतुर्थी

भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते. सुमारे ३.५ हजार वर्षांपूर्वी गणेश पूजनाला प्रारंभ झाला. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव म्हणजे मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करण्यास शास्त्रात सांगितले आहे. प्राचीन काळी शेतावर किंवा नदीकाठी जाऊन तेथील मातीची गणेशमूर्ती तयार करून तेथेच पूजन व लगेच विसर्जन करत असत. त्यानंतर गणेशमूर्ती घरी आणून दीड, तीन, पाच, सात किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत पूजन करून नंतर मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली, असे म्हटले जाते. 

गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!

माघ महिन्यात श्री गणेश जयंती का साजरी केली जाते?

माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हणतात. या दिवशी ढुंढिराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते. 

श्रीगणपतीचे, विनायकाचे चरित्र मोठे आदर्श

माघ महिन्यातील विनायक चतुर्थी म्हणजे श्रीगणेश जयंती. गणपतीचे दोन प्रमुख अवतार आहेत. एक शिव -पार्वतीचा पुत्र गजानन आणि दुसरा कश्यप आणि अदिती यांचा मुलगा विनायक, महोत्कट विनायक. या विनायकाने अगदी बालपणापासून पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली. त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्याने देवतांनाही संकटमुक्त केले. ऋषी, साधू, मुनिजन अशांना निर्वेधपणे जगता येईल, अशी अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली. हे त्याचे उपकार स्मरण्यासाठी आपण गेली शतकानुशतके त्याचा हा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. श्रीगणपतीचे, विनायकाचे चरित्र या दृष्टीने मोठे आदर्श असे आहे.

भाद्रपद महिन्यात श्री गणेश चतुर्थी एका मासाचे व्रत

श्री गणेश कोशानुसार, गाणपत्य संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे व्रत आहे. श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदी किनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावी, असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे. ही पार्थिव गणेश पूजा दिवस म्हणजे आपण आज साजरी करत असणारी गणेश चतुर्थी होय. या चतुर्थीला गणपतीची षोडषोपचारांनी पूजा करायची असते.

१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा

माघी गणेशोत्सवाची मोठी परंपरा

भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. पूर्वी हा उत्सव केवळ मंदिरांपुरता मर्यादित होता. आता हा उत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे. मोठ्या सार्वजनिक मिरवणुका नसल्या तरी उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाल्याचे दिसून येत आहे. ठाण्याला सार्वजनिक माघी गणेशोत्सवाची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा आहे. नौपाड्यातील उमा नीळकंठ व्यायामशाळेतील नौपाडा माघी गणेशोत्सव मंडळ अमृत महोत्सव साजरा करत आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १९३१ साली नौपाडा माघी गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. साधारणपणे १२० ते १२२ सार्वजनिक तसेच ५०० ते ६०० घरगुती माघी गणपतींची स्थापना करण्यात येते. 

गणेश जयंती अन् गणेश चतुर्थी याबाबत पुराण कथा काय सांगते?

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. तसेच माघ शुद्ध चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी करण्यात येते. हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रासह भारतातील अन्य राज्यांमध्ये उत्साहाने साजरे करण्यात येतात. परंतु, या दोन्ही चतुर्थींमध्ये फरक आहे. या संदर्भात विष्णुपुराण आणि गणेश पुराणात कथा सांगितलेली आहे. गणेश पुराण हे गाणपत्य सांप्रदायातील महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण ब्रह्मदेवाने व्यासांना, व्यासांनी भृगू ऋषीला आणि भृगू ऋषींनी सोमकांत राजाला सांगितली. उपासनाखंड आणि क्रीडाखंड असे या पुराणाचे दोन विभाग आहेत. गणेश पुराणामध्ये गणपतीसंदर्भातील अनेक कथा सांगितलेल्या आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे मुख्यतः एक व्रत आहे. काहीजण या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानतात. परंतु, गणेश पुराणानुसार गणपतीचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला नाही. या चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी असेही म्हणतात. गणेश जयंती हा गणेश जन्मोत्सव आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे खरेतर व्रत आहे. 

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ganesh Jayanti and Ganesh Chaturthi: Understand the Key Differences

Web Summary : Ganesh Jayanti, in Magh, marks Ganesha's birth, while Ganesh Chaturthi, in Bhadrapad, is a significant vrata. Both are celebrated with fervor, but the Puranas highlight distinct origins and observances, clarifying common confusions.
टॅग्स :Maghi Ganesh Jayantiमाघी गणेश जयंतीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणपती उत्सव २०२५vinayak chaturthiविनायक चतुर्थीGanesh Chaturthiगणेश चतुर्थीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सणganpatiगणपती 2025