मृत्यूला हुलकावणी द्यायला गेला आणि मृत्यूमुखी पडला; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 06:57 PM2021-04-10T18:57:15+5:302021-04-10T18:58:29+5:30

भगवान श्रीकृष्ण गीतेत कृष्णाला सांगतात, पुढे काय होईल याची काळजी करू नकोस, तो भार देवावर टाक आणि तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा...!

Went to escape death and died; Read this parable! | मृत्यूला हुलकावणी द्यायला गेला आणि मृत्यूमुखी पडला; वाचा ही बोधकथा!

मृत्यूला हुलकावणी द्यायला गेला आणि मृत्यूमुखी पडला; वाचा ही बोधकथा!

Next

'समय से पेहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलने वाला!' हे वाक्य आपण कधी ना कधी वाचले असेलच. या वाक्याचे मर्म समजून घेतले, तर आपली अतिकाळजी करण्याची चिंताच मिटून जाईल. पण तसे होत नाही, आपण अकारण काळजी करत बसतो आणि घडते भलतेच!

एकदा एक तरुण सकाळी झोपेतून उठतो डोळे उघडतो, तर समोर यमराज उभे असतात. त्यांना पाहून तो घाबरतो. यमराज म्हणतात, `चल मी तुला न्यायला आलोय. आजच्या यादीत पहिले नाव तुझे आहे.'

हे ऐकून तो तरुण गोंधळून जातो. आज, आत्ता, ताबडतोब निघायचे? कोणालाही न भेटता? घरच्यांचे, मुला बाळांचे काय होईल. किमान एक दिवस मिळाला असता, तर घरच्यांची पुढची व्यवस्था तरी लावून गेलो असतो. काहीही करून यमराजांना हुलकावणी दिली पाहिजे असा त्याच्या मनात विचार येतो. 

तो यमराजाला म्हणतो, `यमराज मृत्यूपूर्वी शेवटची इच्छा प्रत्येकाला विचारली जाते ना? मी फार काही मागत नाही. पण सवयीप्रमाणे एक कप चहा पितो मग सोबत येतो.'

एवढी शुल्लक बाब पूर्ण करण्यासाठी यमराज होकार देतात. तरुण स्वत:साठी आणि यमराजांसाठी चहा बनवतो. यमराजांच्या चहात झोपेचे औषध टाकतो. चहा पिऊन यमराजांना डुलकी लागते. तेवढ्या वेळात तो त्यांच्या यादीतले पहिले नाव खोडून सर्वात शेवटी स्वत:चे नाव लिहितो. तो विचार करतो, जायचे तर आहेच, किमान यमराज बाकीच्यांना घेऊन येईपर्यंत पूर्ण दिवस तरी मिळेल.

यमराज झोपून उठतात. तरुण जाण्याची तयारी दाखवतो. यमराज म्हणतात, `लोक मला पाहून शिव्या घालतात. तू माझे स्वागत केलेस. मी खुष झालो आहे. आजच्या यादीची सुरुवात मी शेवटून पहिली करतो.'

पाहतो तर शेवटून पहिले नाव तरुणाचे असते. त्याच्या आगाऊपणाबद्दल यमराज रागवतात आणि तडक त्याला घेऊन स्वर्गलोकी जातात. तिथे भगवान विष्णू आणि चित्रगुप्त यांच्याशी तरुणाची गाठ पडते. चित्रगुप्त म्हणातात, `तू देवकार्यात अडथळा आणून चूक केलीस. तुझा मृत्यू आज तसाही टळणार होता, पण तू तो ओढावून घेतलास.' 
यावर भगवान विष्णू म्हणतात, हे मानवा,

'तू ते करतो, जे तुला आवडते,
पण होते तेच, जे मला आवडते,
म्हणून तू ते कर, जे मला आवडते,
मग तेच होईल, जे तुला आवडते!!!'

म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेत कृष्णाला सांगतात, पुढे काय होईल याची काळजी करू नकोस, तो भार देवावर टाक आणि तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा...!

Web Title: Went to escape death and died; Read this parable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.