शिवानी दीदींशी विजय दर्डा साधणार संवाद; उलगडणार समाधानी जीवनाचे रहस्य

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 6, 2020 08:00 IST2020-11-06T08:00:00+5:302020-11-06T08:00:07+5:30

मानवी मूल्यांची जपणूक, नातेसंबंध, यश-अपयश, अध्यात्म इ. विषयांवर ब्रह्मकुमारी शिवानी दीदी 'लोकमत भक्ती' या युट्यूब चॅनेलद्वारे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.

Vijay Darda's dialogue with Shivani Didi; The secret of a contented life unfolds | शिवानी दीदींशी विजय दर्डा साधणार संवाद; उलगडणार समाधानी जीवनाचे रहस्य

शिवानी दीदींशी विजय दर्डा साधणार संवाद; उलगडणार समाधानी जीवनाचे रहस्य

ज्योत्स्ना गाडगीळ 

मनुष्याच्या आयुष्यात सुख दुःखाचा खेळ हा ऊन सावलीसारखा असतो. सुखाची सावली आल्हाददायक असते, परंतु दुःखाच्या झळा असह्य होतात आणि संघर्षमयी प्रवास सुरू होतो. अशा संघर्षमयी काळात निभाव कसा लावावा, हे जाणून घेण्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आंतराष्ट्रीय व्याख्यात्या ब्रह्मकुमारी शिवानी दीदी 'लोकमत भक्ती' या युट्यूब चॅनेलद्वारे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष विजय दर्डा त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

ब्रह्मकुमारी शिवानी दीदी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेरक वक्ता म्हणून ओळखल्या जातात. मानवी मूल्यांची जपणूक, नातेसंबंध, यश-अपयश, अध्यात्म इ. आयुष्याला वळण देणाऱ्या विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. आजच्या संघर्षमयी काळात हतबल झालेल्या मनुष्याने संयम कसा राखावा, परिस्थितीचा सामना कसा करावा आणि संकटातून संधी कशी शोधावी, इ. बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आज सायंकाळी युट्युब लाईव्हवर त्या आपल्या भेटीस येणार आहेत. श्रोत्यांनीदेखील या चर्चासत्रात जरूर सहभागी व्हावे आणि संघर्षमय परिस्थितीशी लढण्याचे बळ शिवानी दीदी यांच्याकडून मिळवावे.

Read in English

Web Title: Vijay Darda's dialogue with Shivani Didi; The secret of a contented life unfolds