शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:49 IST

Vat Purnima 2025 Puja Vidhi, Sahitya, Shubh Muhurat: अनेक नववविवाहितांना वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी कशी करावी हे माहीत नसते, त्यांच्यासाठी ही सविस्तर माहिती. 

Vat Purnima 2025 Puja Vidhi: ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत केले जाते. तिलाच वटपौर्णिमेचे व्रत असेही म्हणतात. सौभाग्यवती हे व्रत आयुष्यभर करतात. आपल्या पतीला, मुलांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे ही त्यामागे भावना असते. वटवृक्षाची दाट सावली ज्याप्रमाणे सर्वांना आश्वासक वाटते, तशी आपल्या पतीच्या प्रेमाच्या छायेत आयुष्यभर निर्धास्तपणे राहावे अशी प्रत्येक महिलेची अपेक्षा असते. नवरा बायकोचे प्रेम वाढावे यासाठी हे व्रत केले जाते. अलीकडे तरुणींबरोबर तरुणांचाही यात समावेश दिसतो. आपला पती साताजन्माचा सोबती असावा ही जशी पत्नीची अपेक्षा असते, तशीच हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून पतीही वडाची पूजा करतात. नात्यातला हा समजूतदारपणाच धर्म संस्कृतीला अपेक्षित आहे. 

Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!

तर हे व्रत पहिल्यांदा करणाऱ्या सुवासिनींसाठी या व्रताची सविस्तर माहिती जाणून घेऊया. यंदा १० जून रोजी वटपौर्णिमा(Vat Purnima 2025) आहे. हे व्रत करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांनी पुढीलप्रमाणे तयारी करावी. व्रताला लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे - 

व्रतासाठी लागणारे साहित्य(Vat Purnima Puja List):

काळे मणी , सूतगुंडी (पांढरा सुती धागा), आरतीचे ताट, त्यामध्ये धूप, निरांजन, अगरबत्ती, तांदूळ, हळद-कुंकू, खोबऱ्याची वाटी, सुपारी, फुले व पाच फळे, विड्याची पाने, नैवेद्यासाठी गूळ खोबरे, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), पाण्याने भरलेला कलश, व्रतकथेची पोथी 

शुभ मुहूर्त(Vat Purnima Shubh Muhurta 2025) : 

यंदा ज्येष्ठ पौर्णिमा तिथी १० जून रोजी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ जून रोजी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी संपेल. मात्र व्रताचरणासाठी १० जून रोजी सकाळी ६. ३३ ते १०. २१ हा शुभ मुहूर्त दिला आहे. 

Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

व्रत विधी(Vat Purnima Pujavidhi 2025): 

  • वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर देवपूजा करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. 
  • साडी नेसून सौभाग्य अलंकार घालावेत. 
  • दिलेले साहित्य घेऊन घराजवळील वटवृक्षाजवळ पूजेसाठी जावे. 
  • सुपात विड्याची पाच पाने आणि फळं ठेवावीत. 
  • वडाच्या झाडाजवळ बसून पूजा करावी. 
  • वडाला हळद कुंकू वाहून वाण ठेवावे आणि सूतगुंडी वडाला बांधून प्रदक्षिणा घालाव्यात. 
  • पूजा पूर्ण करून पुढील श्लोक म्हणावा -
  • वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। 
  • वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।। 
  • तिथे उपस्थित असलेल्या महिलांना हळद कुंकू लावून वाण द्यावे. 
  • गोरगरिबांना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान द्यावेत. 
  • पूर्ण दिवस उपास शक्य नसेल तर निदान पूजा होईपर्यंत काही खाऊ नये आणि पूजा झाल्यावर फळं खावी किंवा फराळ करावा. 
  • वडाला नमस्कार करून घरातल्या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करा. 
  • तिथे बसून पोथी वाचणे शक्य नसेल तर घरी आल्यावर देवासमोर बसून वटसावित्रीची कथा वाचा. 
  • वृक्ष लागवडीचा संकल्प करून एखादे तरी रोप लावा. 

Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!

टॅग्स :Vat Purnimaवटपौर्णिमाPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणspiritualअध्यात्मिकmarathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र