Varuthini Ekadashi 2022: मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते वरुथिनी एकादशीचे व्रत; जाणून घ्या सविस्तर पूजाविधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 12:19 PM2022-04-25T12:19:19+5:302022-04-25T12:19:38+5:30

Varuthini Ekadashi 2022: वरुथिनी एकादशीला विशेष योग जुळून येत आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी हे योग अतिशय शुभ मानले जातात.  

Varuthini Ekadashi 2022: Vows of Varuthini Ekadashi are performed for salvation; Learn the detailed rituals! | Varuthini Ekadashi 2022: मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते वरुथिनी एकादशीचे व्रत; जाणून घ्या सविस्तर पूजाविधी!

Varuthini Ekadashi 2022: मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते वरुथिनी एकादशीचे व्रत; जाणून घ्या सविस्तर पूजाविधी!

googlenewsNext

२६ एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी आहे. वर्षभरातील प्रत्येक एकादशीचे स्वतंत्र महत्त्व असते. त्यानुसार वरुथिनी एकादशी मोक्षदायी असल्याचे म्हटले जाते. शास्त्रानुसार असे मानले जाते की जो कोणी हे व्रत भक्तिभावाने पाळतो आणि नियमानुसार भगवान विष्णूची पूजा करतो, त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. वरुथिनी एकादशीची शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत जाणून घ्या.

वरुथिनी एकादशीला विशेष योग जुळून येत आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी हे योग अतिशय शुभ मानले जातात.  

ब्रह्मयोग- २६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७. ०६ मिनिटांपर्यंत ब्रह्मयोग
शतभिषा नक्षत्र - संध्याकाळी ०४. ५६ मिनिटांपर्यंत
त्रिपुष्कर योग - २७ एप्रिल रोजी रात्री १२. ४७ ते पहाटे ५.४४ पर्यंत
अभिजात मुहूर्त - सकाळी ११. ५३ ते दुपारी १२. ४५पर्यंत

व्रताचरण : एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे. पिवळी फुले वाहावीत. चंदन लावावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी. त्यानंतर विष्णु सहस्रनामाच्या पठणासह एकादशी व्रताची कथा वाचावी. शेवटी आरती करावी. दिवसभर ईश्वराचे स्मरण ठेवून आपले दैनंदिन कार्य करावे. आणि एकादशीच्या दिवशी फळ खाऊन द्वादशीला पुनश्च विष्णू पूजा करून उपास सोडावा. उपास आणि साग्रसंगीत पूजा शक्य नसेल तर किमान १०८ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करावा. 

 

Web Title: Varuthini Ekadashi 2022: Vows of Varuthini Ekadashi are performed for salvation; Learn the detailed rituals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.