Valentines Day 2023 : 'या' गोष्टींचे स्वप्नात दिसणे म्हणजे समजून जा, 'यंदा कर्तव्य आहे!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:31 IST2023-02-08T17:31:10+5:302023-02-08T17:31:35+5:30
Valentines Day 2023: प्रेमसप्ताह सुरू झालेला आहे, त्यामुळे उठता बसता झोपेतही प्रेमाचे वारे डोक्यात घुमत असतील तर स्वप्नशास्त्राचे त्यावर केलेले शिक्कामोर्तब जाणून घ्या.

Valentines Day 2023 : 'या' गोष्टींचे स्वप्नात दिसणे म्हणजे समजून जा, 'यंदा कर्तव्य आहे!'
संपूर्ण जग प्रेमरंगात रंगलेले असताना काहीजण बिचारे स्वप्नंच रंगवत राहतात. अशा सिंगल लोकांना मिंगल होण्याची घाई असते, पण दूरवर कुठेही आशेचा किरण दिसत नाही. हीच आशा पल्लवित करण्यासाठी स्वप्न ज्योतिष शास्त्र तुमच्या स्वप्नांचा उलगडा करत आहे. स्वप्न ज्योतिष शास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नात पुढील गोष्टी दिसत असतील तर लवकरच तुमचा प्रेमाचा शोध संपेल, असे म्हटले आहे. ती लक्षणे कोणती ते जाणून घेऊ.
>> स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते. वैवाहिक आयुष्य सुखाचे जाणार यासंबंधी ते संकेत आहेत. तसेच मोरपीस दिसणेदेखील शुभ असते. तुमच्या मोरपंखी आयुष्याची लवकरच सुरुवात होणार आहे, याची सूचना मिळते.
>> स्वप्नात आनंदाने स्वतःलाच नाचताना पाहणे, हे लवकरच लग्न ठरणार असल्याचे संकेत आहेत. असे स्वप्न सुखी दाम्पत्य जीवनाचे प्रतीकही मानले जाते.
>> वस्त्र किंवा सोने खरेदी करत असल्याचे स्वप्न पडले असता, श्रीमंत जोडीदार मिळण्याची दाट शक्यता असते.
>> स्वप्नात तुम्ही एखाद्या यात्रेत किंवा गर्दीमध्ये हरवून जात असाल, तर घाबरू नका तुमचा शोध घेणारा जोडीदार लवकरच तुमचा हात धरणार आहे.
>> विवाहेच्छुक मंडळींनी स्वप्नात कोणाची प्रेत यात्रा किंवा शव पाहिले, तर त्यांचे वैवाहिक जीवन कलह पूर्ण असू शकते.
>> स्वप्नात कोणाशी टोकाची भांडणे होत असतील आणि अशी स्वप्नं वारंवार दिसत असतील, तर अशा लोकांचे वैवाहिक जीवन धोक्यात असते.
>> स्वप्नात तुम्ही स्वतःला कामात गढून गेलेले पहात असाल, तर तुमचे वैवाहिक जीवन खडतर परंतु सुखमय व्यतीत होते.
>> स्वप्नात तुमचा बघण्याचा कार्यक्रम दिसत असेल पण बघायला आलेली व्यक्तीच आठवत नसेल, तर काळजी करू नका, तुम्हाला मनपसंत जोडीदारच मिळणार आहे.
आता वरील सर्व शक्यता वाचून तुम्हाला कोणती स्वप्नं पडतात याचा विचार करा पण त्यात अडकून राहू नका. लग्नाच्या गाठी ब्रह्म देवाने स्वर्गात बांधलेल्या आहेत. त्या कधी, कशा, कुठे बांधल्या जातील हे त्यालाच माहीती! स्वप्नांमध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिलासा देण्याचे काम नक्की करतील. बाकी आपले चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव यावरच आपला जोडीदार ठरणार आहे, हे लक्षात ठेवा.