एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:06 IST2025-11-03T12:02:43+5:302025-11-03T12:06:51+5:30
Vaikuntha Chaturdashi 2025 Tirupati Balaji Most Impactful Mantra: अगदी काही सेकंदात म्हणून होणाऱ्या प्रभावी मंत्राचा नित्य नियमाने जप करावा, असे सांगितले जाते.

एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
Vaikuntha Chaturdashi 2025 Tirupati Balaji Most Impactful Mantra: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास काळ संपला आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला की, श्रीविष्णू योगनिर्देत जातात, तेव्हापासून ब्रह्मांडाचा कारभार महादेवांकडे असतो, अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीला श्रीविष्णू योगनिर्देतून बाहेर येतात आणि पुन्हा एकदा सृष्टीची जबाबदारी घेतात, असे म्हटले जाते. मंगळवार, ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे. या दिवशीपासून पुढील २१ दिवस केवळ एका मंत्राचा जप करणे शुभ पुण्याचे मानले गेले आहे.
विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून श्रीविष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेव विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरीहर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तिरुपती बालाजीला भगवान विष्णूंचे एक रूप मानले जाते. यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात.
स्वतः प्रकट झाल्यामुळे या मूर्तीचे विशेष महत्त्व
तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वांधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. वर्षाला कोट्यवधी भाविक तिरुपती बालाजीचे दर्शन घेतात. कोट्यवधी रुपये दान केले जातात. तसेच या ठिकाणी केस अर्पण करण्याची प्रथा आहे. स्थानिक मान्यतेनुसार, येथे मंदिरात स्थापित काळ्या रंगाची दिव्य मूर्ती कोणीही तयार केली नसून ती स्वतः जमिनीतून प्रकट झाली होती. स्वतः प्रकट झाल्यामुळे या मूर्तीचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
अद्भूत लाभ, चमत्कारिक फायदे, नित्य जपा
तिरुपती बालाजी देवतेचे महात्म्य आणि त्याबाबतच्या मान्यता प्रचलित आहे. तिरुपती बालाजीचा असा एक प्रभावी मंत्र असल्याचे सांगितले जाते. हा मंत्र एक शुद्ध ध्वनी कंपन आहे, जो मनाला भ्रमापासून वाचवतो. या मंत्राचा सतत जप केल्याने हा मंत्र सकारात्मक ऊर्जा देतो. या मंत्राचा जप केल्यावर मन शांत होते आणि ध्यानस्थ होते. या मंत्राचे जप केल्याने मनाला आनंदाची अनुभूती होते, असे मानले जाते. या मंत्राचा नियमितपणे, दररोज न चुकता जप केल्यास याचे अद्भूत, चमत्कारिक फायदे अनुभवता येतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याचे म्हटले जाते. हे मनाच्या भावना शुद्ध करते आणि शरीरात चैतन्य निर्माण करते, असे सांगितले जाते. या मंत्राने भीतीची भावना कमी होते. सर्जनशील प्रक्रिया वाढते. मनातून नैराश्य दूर होण्यास मदत होते. मन शांत होण्यास आणि चांगली झोप येण्यास मदत होते. हा मंत्र रोज ऐकल्याने आध्यात्मिक समृद्धीचा अनुभव येतो, अशी भाविकांची मान्यता असल्याचे सांगितले जाते. वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने किमान २१ दिवस हा एक प्रभावी मंत्र जपण्याचा संकल्प करावा, असे म्हटले जाते.
वेंकटेश्वर तिरुपती बालाजीचा अत्यंत प्रभावी मंत्र
ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमः ॥
श्रीमन नारायण नमो नमः ॥
तिरुमल तिरुपति नमो नमः ॥
जय बालाजी नमो नमः ॥
ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमः ॥
श्रीमन नारायण नमो नमः ॥
तिरुमल तिरुपति नमो नमः ॥
जय बालाजी नमो नमः ॥
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.