सृष्टीचे पालनकर्ता भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस (Tulsi) अत्यंत प्रिय आहे. नैवेद्यावर तुळशीचे दल अर्थात तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. कार्तिक महिन्यात दरवर्षी तुळशीचे लग्न विष्णू तथा कृष्ण अवतार असलेल्या शालिग्राम (Shaligram) यांच्यासोबत लावले जाते. देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा विवाह सोहळा होतो आणि याच दिवसापासून चातुर्मास संपून सर्व शुभ-मंगल कार्याला पुन्हा सुरुवात होते. यंदा २ नोव्हेंबर रोजी देवउठनी अर्थात प्रबोधिनी एकादशी(Prabodhini Ekadashi 2025) आहे. या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो. मात्र एकादशीला अनेक भाविकांचे उपास असल्याने लोक द्वादशी ते त्रिपुरी पौर्णिमा या कालावधीत तुलसी विवाह करतात. यंदा ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरी पौर्णिमा(Tripuri Purnima 2025) आहे.
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
पण श्री विष्णूंचे तुळशीशी लग्न लावून देण्यामागे काय आहे कारण? जाणून घेऊया तुळस-शालिग्राम विवाहाची पौराणिक कथा (Tulsi Vivah Katha)
पौराणिक कथांनुसार, जालंधर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. या राक्षसाच्या पत्नीचे नाव वृंदा होते. वृंदा ही भगवान विष्णूंची निस्सीम भक्त होती. जेव्हा जालंधर युद्धावर जात असे, तेव्हा वृंदा भगवान विष्णूंची पूजा करत असे आणि तिच्या पतीव्रता धर्मामुळे जालंधरला हरवणे कोणत्याही देव-देवतेला शक्य नव्हते.
जालंधरच्या अत्याचारांनी जेव्हा सर्व देवी-देवता त्रस्त झाले, तेव्हा त्यांनी मदतीसाठी भगवान विष्णूंकडे धाव घेतली. भगवान विष्णूंनी सांगितले की, वृंदेचे सतीत्व नष्ट केल्याशिवाय जालंधरला पराभूत करणे शक्य नाही. यासाठी, भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदेच्या पतिव्रता धर्माचे उल्लंघन केले. वृंदेचे पतिव्रता धर्म खंडित झाल्यामुळे जालंधरच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या. परिणामी, युद्धात तो भगवान शिवांशी लढताना हरला आणि शिवजींनी त्याचे शिर धडापासून वेगळे केले.
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
वृंदेचा शाप आणि शालिग्राम अवतार:
आपल्यासोबत छल झाल्याचे जेव्हा जालंधरची पत्नी वृंदा हिला समजले, तेव्हा तिला प्रचंड राग आला. क्रोधित होऊन तिने जगाचे पालनहार असलेल्या भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूंनी तो शाप स्वीकारला आणि ते शालिग्राम रूपात पाषाण (दगड) बनले. यामुळे देवी लक्ष्मी खूप दुःखी झाल्या आणि त्यांनी वृंदेकडे शाप परत घेण्याची विनंती केली.
वृंदाने आपला शाप मागे घेतला, पण त्यानंतर तिने स्वतःला आत्मदाह केले. ती जळून भस्म झाल्यावर, तिच्या राखेतून एक रोपटे उगवले. भगवान विष्णूंनी त्या रोपट्याला 'तुळस' हे नाव दिले. तुळशीला माता लक्ष्मीचाच एक अंश मानले जाते.
भगवान विष्णू वृंदेच्या पतिव्रता धर्मावर खूप प्रसन्न होते, त्यामुळे त्यांनी वरदान दिले की, त्यांच्या शालिग्राम रूपाची पूजा नेहमी तुळशीसोबतच केली जाईल. तेव्हापासून दरवर्षी भगवान विष्णूंच्या शालिग्राम स्वरूपासह तुळशीचा विवाह करण्याची परंपरा सुरू झाली.
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
तुळशी विवाहाचे धार्मिक महत्त्व आणि लाभ :
लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद: धार्मिक मान्यता आहे की, तुळशीचा विवाह केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचीही कृपा प्राप्त होते.
आर्थिक समस्या दूर: हे व्रत किंवा विवाह केल्याने भक्ताला धन-समृद्धी आणि यश प्राप्त होते, तसेच आर्थिक समस्या दूर होतात.
विवाहातील अडथळे दूर: ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील, त्यांचे अडथळे तुळशी विवाह विधीने दूर होतात, असे मानले जाते.
शुभ कार्यांची सुरुवात: तुळशी विवाहानंतर पुढील संपूर्ण वर्षासाठी विवाह आणि अन्य शुभ-मांगलिक कार्यांना सुरुवात होते.
Web Summary : Lord Vishnu marries Tulsi annually despite being Lakshmi's consort due to the legend of Vrinda's curse and blessing. Performing Tulsi Vivah brings prosperity, removes obstacles in marriage, and marks the beginning of auspicious events.
Web Summary : लक्ष्मीपति विष्णु हर साल तुलसी से वृंदा के श्राप और आशीर्वाद की कथा के कारण विवाह करते हैं। तुलसी विवाह करने से समृद्धि आती है, विवाह में बाधाएं दूर होती हैं और शुभ कार्य शुरू होते हैं।