शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

Tulasi Mala: इस्कॉनचे अनुयायी तसेच वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशी माळा असण्याचे कारण जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 11:46 IST

Tulasi Mala Benefits: तुळशीच्या माळेने केवळ शरीरशुद्धी नाही तर चित्तशुद्धीदेखील होते असा भाविकांचा अनुभव आहे, त्याचे अन्य गुणधर्मही जाणून घ्या. 

हिंदू धर्मात तुळशीचे मोठे महत्त्व आहे. दररोज तुळशीला पाणी अर्पण करण्यापासून ते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे, तुळशीची दोन पाने खाणे, तुळशी हार देवाला घालणे अशा अनेक बाबतीत तुळशी भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग बनली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तुळशीचे बरेच फायदे आहेत. आज आपण तुळशी माळ घातल्याने होणाऱ्या फायद्याची माहिती घेऊया. मानसिक विकार, ताण तणाव यावर तुळशी माळेचा उपाय सांगितला जातो. 

तुळशीच्या रोपाने आणि तुळशीच्या रूपाने जसे घरात चैतन्य नांदते, त्यानुसार तुळशी माळ घातल्याने शरीरात चैतन्य नांदते. सामान्यत: भगवान विष्णू आणि कृष्णाचे भक्त तुळशीची माळ दागिन्याप्रमाणे गळ्यात घालतात. त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या गळ्यात देखील तुळशी माळ कायम आढळते. गळ्यात तुळशीची माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मानसिक आरोग्यही सुधारते. तणाव कमी करण्यास मदत होते आणि बर्‍याच आजारांपासून सुटका मिळवण्यासाठीदेखील तुळशी माळेचा वापर केला जातो. 

तुळशीचे दोन प्रकार आहेत : 

श्यामा तुळशी आणि राम तुळसी. श्यामा तुळशीच्या बीजाचा हार घातल्यास मानसिक शांती मिळते आणि मनात सकारात्मकता निर्माण होते. यामुळे आध्यात्मिक तसेच कौटुंबिक आणि भौतिक प्रगती होते. भगवंताप्रती भक्ती आणि श्रद्धा वाढते. दुसरीकडे, राम तुळशीची माळ परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सात्विक भावना जागृत होते. कर्तव्यपूर्तीचे भान राहते. 

तुळशीची माळ घालण्याचे फायदे :

>>तुळशीची माळ परिधान केल्याने मन शांत होते आणि आत्मा शुद्ध होतो.

>>ही माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते, चैतन्य वाढते. पचनशक्ती, ताप, सर्दी, डोकेदुखी, त्वचेचा संसर्ग, मेंदूच्या आजार आणि गॅसशी संबंधित अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. तसेच संसर्गामुळे होणा-या आजारांपासून संरक्षण होते.

>>तुळशी ही एक संजीवनी आहे, तिच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, पचनशक्ती वाढते तो. गळ्यामध्ये तुळशीची माला परिधान केल्याने विद्युत तरंगांचे उत्सर्जन होते जे रक्त प्रवाही ठेवण्यात अडथळा येऊ देत नाही. या व्यतिरिक्त तुळशी हिवताप आणि अनेक प्रकारच्या तापांमध्ये खूप फायदेशीर आहे.

>>तुळशीची माळ परिधान केल्यास मानसिक शांती मिळते. गळ्याभोवती परिधान केल्याने अत्यावश्यक अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट्सवर दबाव आणला जातो, व  मानसिक ताणतणाव कमी होतो. स्मरणशक्ती वाढविण्यात देखील तुळशी माळेची मदत होते. तुळशी माळेत रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद आहे. 

>>कावीळ झाली असता तुळशीचा हार घालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. एवढेच काय तर कोणत्याही प्रकारच्या तापावर तुळशीचा काढा रामबाण उपाय ठरतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स