शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Tukaran Beej: आजच्या तिथीला दुपारी तुकोबारायांना सर्वांचा निरोप कसा घेतला, याचे निळोबारायांनी केलेले वर्णन!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 7:00 AM

Tukaram Beej: आज तुकाराम बीज, आजच्या दिवशी तुकोबारायांनी वैकुंठ गमन केले, तो क्षण कसा होता हे संत निळोबारायांच्या वर्णनातून जाणून घ्या!

>> रोहन उपळेकर 

२७ मार्च रोजी फाल्गुन शुद्ध द्वितीया, अर्थात् श्री तुकाराम बीज. हा वारकरी संप्रदायातला एक सर्वात मोठा महोत्सव आहे. भगवान श्रीपंढरीनाथांचे परमभक्त सद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांची ही वैकुंठगमन तिथी, हा आम्हां वारकरी भक्तांसाठी दसरा-दिवाळीपेक्षाही मोठाच सण आहे. आजच्याच पावन तिथीला सद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान श्रीपंढरीनाथांच्या विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले.

श्रीसंत तुकोबारायांचे परमशिष्य श्रीसंत निळोबाराय महाराज पिंपळनेरकर आपल्या नमनात म्हणतात,

तुका भासला मानवी देहधारी ।परि हा लीलाविग्रही निर्विकारी ।स्वयें श्रीहरी व्यापकु सर्वजीवा ।तुका तोचि तो हा परब्रह्म ठेवा ॥४॥जयां पूजिलें आदरें पांडुरंगें ।विमानस्थ केलें प्रयाण प्रसंगे ।तनु मानवी दिव्य रूपीच केली ।न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली ॥५॥

"आमचे सद्गुरुमहाराज हे जरी देहधारी भासत असले, तरी ते देहात राहूनही देहसंबंधात गुंतलेले नाहीत, ते या मायेतही पूर्ण निर्विकारीच आहेत. ते साक्षात् लीलाविग्रही भगवान श्रीहरीच आहेत व सर्व विश्व व्यापून उरलेले आहेत. तेच प्रत्यक्ष परब्रह्मरूप आहेत. अहो, ज्यांची साक्षात् परिपूर्णब्रह्म भगवान श्रीपांडुरंगांनी पूजा केली, ज्यांना प्रयाणाच्या प्रसंगी स्वहस्ते दिव्य विमानात बसवून आपल्या सोबत वैकुंठधामी नेले आणि आपला मर्त्य पांचभौतिक देह सुद्धा ज्यांनी दिव्यरूप केला, त्या सद्गुरु श्री तुकोबारायांचा अद्भुत महिमा म्या पामराने कुठवर कथन करावा ?"

खरोखरीच, श्री तुकोबा जन्मभर जे बोलले तेच त्यांनी प्रत्यक्ष करूनही दाखवले. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी । किंवा कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥ हे ते नुसते म्हणाले नाहीत, तर त्यांनी स्वत:च ते घडवूनही दाखवले. सद्गुरुकृपेने साधलेल्या सततच्या हरि-कीर्तनभक्तीने आपल्या पांचभौतिक देहासकट ते हरिरूप होऊन ठाकले होते. जे देहातच हरिमय झाले त्यांना देहत्यागसमयी त्या देहाची कसली बंधने अडवू शकणार सांगा बरं ? म्हणूनच, आतबाहेर हरिमय झालेले श्री तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. जशी सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी एकमेवाद्वितीय आहे, तसेच श्री तुकोबांचे वैकुंठगमनही अद्वितीयच आहे !!

फाल्गुन शुद्ध द्वितीयेच्या पावन तिथीच्या मध्यान्हीला, ३७३ वर्षांपूर्वी वैकुंठगमनाचा तो दिव्य सोहळा साकारला होता. म्हणून या मध्यान्हसमयी आपणही श्री तुकोबांच्या नामाचा जयजयकार करीत त्यांच्या वैकुंठगमनाचा सोहळा बसल्या जागी मनोभावे साकारूया आणि धन्य धन्य होऊया !! 

तुकीं तुकला तुका, विश्व भरोनि उरला लोकां!