शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
3
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
4
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
5
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
6
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
7
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
8
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
9
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
10
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
12
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
13
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
14
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
15
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
16
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
17
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
18
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
19
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
20
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' वस्तूंचे करा दान, मिळवा इच्छापूर्तीचे वरदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 11:43 IST

Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेला चंद्रदर्शन घेऊन सांगितलेल्या वस्तूंचे दान करणे इच्छापूर्तीसाठी वरदान ठरते; गमवू नका ही सुवर्णसंधी!

१५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरी पौर्णिमा (Tripuri Purnima 2024) आहे. या पौर्णिमेचे महत्त्व अनेक प्रकारे सांगितले जाते. या पौर्णिमेला मनोरथ पौर्णिमा असेही म्हणतात. धर्मबोध या ग्रंथात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात, कार्तिक पौर्णिमेपासून या व्रताला प्रारंभ केला जातो. पूर्ण वर्षभरातील दर पौर्णिमेला उगवत्या चंद्राची पूजा करून भोजन करावे. मात्र, त्याआधी एक वर्तुळात मिठाची केलेली चंद्रप्रतिमा ठेवून तिचीही पूजा करावी. नंतर सर्व स्त्रियांना हळदीकुंकू आणि सौभाग्यवाण द्यावे. उद्यापनाच्या वेळी कुसुंबी रंगाचे वस्र द्यावे. सौंदर्य आणि संपत्तीसाठी हे काम्यव्रत केले जाते. 

मिठाची चंद्रप्रतिमा करणे तसे कठीण. शिवाय मीठ असे व्यर्थ घालविणे अनेकांना पटणार नाही. त्यामुळे दर पौर्णिमेला चंद्राचे दर्शन घेऊन त्याला केवळ मनोभावे नमस्कार केला तरीही पुरेसे आहे. एरव्हीला कामाच्या व्यापात चंद्रदर्शनाची प्रथा संकष्टी चतुर्थीलाही पाळणे हल्ली कठीण होऊ लागले आहे. कोजागिरी वगळता इतर पौर्णिमांकडे मंडळींचे फारसे लक्ष नसते. ज्यांना गच्चीवर जाऊन चंद्रदर्शन घेणे सोयीचे असेल, वा घरातून किंवा घराच्या आवारातून चंद्र दिसू शकत असेल, त्यांनी निदान ते नेत्रसुख तरी जरूर घ्यावे. 

Dev Diwali 2024: आज देवदिवाळी, उद्या त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्नान तसेच तुलसी विवाह समाप्ती!

कूष्मांड व्रत : कार्तिकी पौर्णिमेला कोहळ्याच्या वेलींची लक्ष्मी-नारायण म्हणून पूजा करावी. ही पूजा षोडशोपचारी असावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर,

कूष्मांडवल्ली सुभगां सुफलां विश्वरुपिणीम्लक्ष्मीरूपां सुविस्तारां ध्यायामि हरिवल्लभाम् 

ह्या मंत्राने ध्यान करावे. त्यानंतर ती वेल योग्य व्यक्तीला दान करावी. ह्या व्रताचे उद्यापन शुभदिवस आणि मुहूर्त बघून करावे. त्यावेळी कोहळ्याचा वेल आणि लक्ष्मी नारायणाची सोन्याची प्रतिमा करावी. त्यांची पूजा करून मंत्रजागरण करावे. ह्यावेळी सोळा दाम्पत्यांना जेवू घालून दक्षिणा द्यावी, असा या व्रताचा विधी आहे. सर्व पापांच्या नाशार्थ तसेच उत्तम संतती लाभावी म्हणून हे व्रत केले जाते.

पूर्वी लोकांना मुबलक वेळ होता. आताएवढे जीवन गतीमान नव्हते. त्यामुळे अनेक कर्मकांडांनीयुक्त अशी व्रतेदेखील त्यावेळी करता येणे शक्य होते. त्यामुळे या व्रतामध्ये ज्या कोहळ्याच्या वेलीची पूजा करावयाची असते, ती वेल बी रुजवून वाढवण्याचा पूर्व विधी फार आधी म्हणजे मृगशीर्ष नक्षत्रामधून सूर्यभ्रमण चालू असताना एका शुभ दिवशी करण्यास सांगितले आहे. ते बी रुजून वेल वाढून तिला फुले येईपर्यंतच्या काळात त्या वेलीची निगराणी करणे, हेदेखील व्रताचेच एक अंग मानले गेले आहे. आता हे सर्वांनाच शक्य नाही. जागेची अडचण हे त्याचे मुख्य कारण म्हणावे लागेल. एखाद्या विष्णुमंदिरात विचारविनिमय करून कोहळ्याची वेल धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार वाढवून कार्तिकी पौर्णिमेला ती सर्व व्रतकर्त्या मंडळींसाठी पूजा करण्यास उपलब्ध करून द्यावी. अगदीच अशक्य असल्यास कोहळ्याची पूजा करावी. 

आवळीपूजन : आवळे नवमीची पूजा राहून गेलेली असल्यास कार्तिक पौर्णिमेला आवळीच्या वृक्षाची पूजा करण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी शुचिर्भूत होऊण आवळीच्या आवळीच्या वृक्षाची पूजा करून तिला वटपौर्णिमेला वडाच्या वृक्षाला जसे सूत गुंडाळले जाते, तसे सूत गुंडाळावे. श्रीफलासह अर्घ्य द्यावे. तिच्या आठ दिशांना दिवे लावावे. पितरांचे स्मरण करून एका दाम्पत्याला भोजन घालावे. या दिवशी देव येऊन आवळीच्या झाडाखाली भोजन करतात, असे मानले जाते. म्हणून या दिवशी आवळीपूजनाचे अधिक महत्त्व आहे.

आवळा हे लक्ष्मीचे, संपत्तीचे द्योतक आहे. तसेच त्याचे धार्मिक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. उत्सवाच्या निमित्ताने या हे महत्त्व अधोरेखित व्हावे, हाच मुख्य हेतू आहे. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४