शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

आज विनायकी चतुर्थी; जाणून घेऊया बाप्पाच्या संकटनाशन स्तोत्राबद्दल रोचक माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 1:05 PM

संकट नाशन स्तोत्रात बारा गणेश नावांचा व नावानुसार स्थानांचा उल्लेख केला आहे. ही स्थाने सद्यस्थितीत कुठे आहेत, याचीही माहिती दिली आहे.

आपल्या आवडत्या बाप्पाची प्रार्थना,स्तुती करण्यासाठी आपण पूजेला स्तोत्र पठणाची जोड देतो. जसे की संस्कृतातले किंवा मराठीत भाषांतरित केलेले 'गणपती स्तोत्र' अवघ्या दोन मिनिटांत म्हणून होते. हे स्तोत्र संकटनाशन स्तोत्र म्हणूनही ओळखले जाते. ते पाठ करायलाही सोपे असल्याने बालपणापासूनच मुखोद्गत असते. परंतु, आपल्याला त्याचा अर्थ माहीत असतोच असे नाही. आज विनायकी चतुर्थी निमित्त या स्तोत्रात दडलेली माहिती जाणून घेऊया. 

संकट नाशन स्तोत्रात बारा गणेश नावांचा व नावानुसार स्थानांचा उल्लेख केला आहे. ही स्थाने सद्यस्थितीत कुठे आहेत, याचीही माहिती दिली आहे. मध्यंतरी समाज माध्यमावर ही उपयुक्त माहिती वाचनात आली व त्यात उल्लेख केल्यानुसार समर्थ रामदास स्वामींनी या स्तोत्रात दडलेली बाराही गणेशस्थाने शोधून काढून बाप्पाचे दर्शन घेतले होते. ती स्थाने कोणती, हे पाहू. 

प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्। तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्।। २।।

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्न राजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम्।। ३ ।।

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्। एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्।। ४।।

१. वक्रतुण्ड : मद्रास राज्यातील कननूर येथील गाव. २. एकदंत : पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ. ३. कृष्णपिंगाक्ष: मद्रास येथे कन्याकुमारीजवळील गाव. ४. गजवस्त्र : ओरिसा राज्यात भुवनेश्वर जवळ. ५. लंबोदर : याची दोन स्थाने आहेत - १. गणपतीपुळे जवळ   २. मध्यप्रदेश येथील पंचमुखी ओंकारेश्वर ६. विकट : हिमालयाच्या पायथ्याशी ऋषिकेश येथे. ७. विघ्नराजेंद्र : कुरु क्षेत्रात कौरव पांडवांच्या युद्धभूमीजवळ. ८. धुम्रवर्ण : दक्षिणेकडे केरळ राज्यात कालिकतजवळ आणि तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर ९. भालचंद्र : रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे  १०. विनायक : काशी क्षेत्रातील अन्नपूर्णा मंदिराजवळचा धुंडीराज गणेश. ११. गणपती : क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती. १२. गजानन : हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळ ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे. 

आता जेव्हा केव्हा तुम्ही हे गणपती स्तोत्र संस्कृतात 'प्रणम्य शिरसा देवं' किंवा मराठीत 'साष्टांग नमन हे माझे' म्हणाल, तेव्हा या बारा तीर्थक्षेत्रांचा आठव तुम्हाला होईल, हे नक्की!