शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

'ड्रीम जॉब' वगैरे नसतो, मिळालेलं काम आवडीने करायला हवं! -ओशो 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 05, 2020 10:05 PM

गृहिणींनाही कामाचा कंटाळा येतो, परंतु त्या आपल्या स्वयंपाकगृहाला प्रयोगशाळा बनवतात. आपणही आपल्या कार्यशैलीत बदल करून रोजच्या कामाची लज्जत पाहिजे. 

ठळक मुद्देआपल्या कामाकडे तुम्ही कसे पाहता, कसे लेखता, कसे करता, यावर कामाची प्रत ठरते. कोणतेही काम कमी नाही, फक्त तुमच्या कार्यपद्धतीवर त्या कामाची गुणवत्ता ठरत असते.

ज्योत्स्ना गाडगीळ 

जीवनाचे तत्त्वज्ञान साधेसोपे करून सांगायची ओशोंची विशिष्ट हातोेटी आहे. आता हेच बघा ना, गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला उपदेश ओशोंही एका वाक्यात समजवून सांगितला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,

कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन,मा कर्मफलहेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणि।।

हे पार्थ, तुला तुझे कर्म करायचे आहे. ते कर्म, तुला आवडो, न आवडो, त्याचे फळ मिळो न मिळो, त्याचा परिणाम होवो न होवो, तू तुझे कर्म करणे अपेक्षित आहे. त्याचे फळ काय मिळेल, याचा विचार करत बसलास, तर हातून कर्म  घडणारच नाही.

हेही वाचा: जेव्हा सगळं संपवून टाकावंसं वाटतं तेव्हा...; बांबू बियाणाची गोष्ट दाखवेल वाट

आयुष्यात प्रत्येकाला वाटते, आपल्याला 'ड्रीम जॉब' मिळावा. परंतु, उद्योजक रतन टाटा सुद्धा ओशोंप्रमाणेच म्हणतात, 'ड्रीम जॉब' वगैरे संकल्पना अस्तित्त्वात नसते. आवडीचे काम मिळूनही, त्याला अनुकूल स्थिती मिळेल असे नाही, अनुकूल स्थिती मिळाली, परंतु काम आवडीचे मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत आपली मनस्थिती तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतली आणि कामात स्वत:ला झोकून दिले, की आवडते, नावडते असे कामाचे स्वरूप राहणारच नाही. हाताला काम मिळाले, तर बुद्धीला चालना मिळत राहील. 

काम न करता जो बसतो, त्याला 'रिकामा' म्हणतात. अशा लोकांना समाजातच काय, तरी घरातही किंमत नसते. अनेक ठिकाणी ठळक अक्षरात पाटीदेखील लिहिलेली असते, 'कामाशिवाय बसू नये.' रिकामे, आळशी, कर्तव्यशून्य लोकांची घरात, कार्यालयात अडगळ होते. याउलट कामसू व्यक्ती प्रत्येकाला आवडते. ज्येष्ठ मंडळीदेखील निवृत्तीनंतर स्वत:मागे रोजची कामे लावून घेतात. बागकाम, भाजीकाम, वाचन, लेखन,मनन, नातवंडांना खेळवणे, शाळेतून ने-आण करणे, इ. यामुळे त्यांचे मन गुंतून राहते आणि वेळ चांगला जातो. 

काही जण रतीब टाकल्यासारखे काम करतात. अशा लोकांना आपल्या कामात कधीच रस वाटत नाही. उलट लोकांचे काम किती श्रेष्ठ, आपले कनिष्ठ अशी तुलना करण्यात ते वेळ वाया घालवतात. त्यापेक्षा, कामाची शैली बदलली, तर रोजचेच रटाळ काम आनंददायी वाटू लागते. 

गृहिणींनाही कामाचा कंटाळा येतो, परंतु त्या आपल्या स्वयंपाकगृहाला प्रयोगशाळा बनवतात आणि साधी फोडणीची पोळी आणि शिळा भातसुद्धा 'माणिकमोती' म्हणत पेश करतात.  रोज तेच धान्य, तेच मसाले, त्याच भाज्या, तरी त्याला वेगवेगळे वळण देऊन जेवणाची लज्जत वाढवण्याचे कसब त्यांनी अंगिकारले असते. आपणही आपल्या कार्यशैलीत बदल करून रोजच्या कामाची लज्जत  पाहिजे. 

आपल्या कामाकडे तुम्ही कसे पाहता, कसे लेखता, कसे करता, यावर कामाची प्रत ठरते. कोणतेही काम कमी नाही, फक्त तुमच्या कार्यपद्धतीवर त्या कामाची गुणवत्ता ठरत असते.

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर एकदा म्हणाल्या होत्या, `सूरात मी पक्की झाले, ते माझ्या आईमुळे. प्रत्येक गोष्ट अचूक झाली पाहिजे, असा तिचा नेहमीच आग्रह असे. साधा केर काढायचा असेल, तरीदेखील तो इतका स्वच्छ काढावा, की कोणालाही त्या कामाचेदेखील कौतुक वाटले पाहिजे.'

आपण अनेकदा आपली कामे दुसऱ्यांवर सोपवून निर्धास्त होतो. का? तर, आपल्याला खात्री असते, संबंधित व्यक्ती कामात चुकणार नाही, आपले नुकसान होणार नाही. मग, संबंधित व्यक्ती जर ते काम अचूक करत असेल, तर आपण का नाही? हा प्रश्न सतत, स्वत:ला विचारत राहा. आपले काम आनंदाने करा. नाचत-गात राहा.. मग बघा, आयुष्य कधीच कंटाळवाणे वाटणार नाही... कधीच नाही!

हेही वाचा: Sadguru Speech: 'मी काही दिवस सोशल मीडियावरून रजा घेतोय' असा मेसेज करून तर बघा...