शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महाभारत काळापासून आहे राजदंड देण्याची प्रथा; काय आहे त्यामागचा अर्थ? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 16:43 IST

राजदंडाचे मानकरी असणाऱ्यांना मिळणारे अधिकार कोणते आणि राजदंडाची रचना काय सुचवते? महाभारत काळात तो कोणाला मिळालेला ते पाहू! 

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धर्मगुरूंच्या हस्ते सेंगोल अर्थात राजदंड बहाल करण्यात आला. ही अतिशय प्राचीन परंपरा आहे. तमिळनाडूच्या जुन्या मठाच्या अधिनाम महंतांच्या हस्ते तो राजदंड पंतप्रधानांना प्रदान करण्यात आला आणि आपली संस्कृती पुनश्च रुजवण्यात आली आहे. राजदंड केवळ सामर्थ्याचे प्रतीक नाही, तर ती मोठी जबाबदारी आहे, प्रजेसाठी समर्पित राहण्याची!

राजदंड हे सुबत्तेचे प्रतीक आहे. तो शासनकर्त्यांच्या हाती यासाठी सोपवला जातो, जेणेकरून त्याच्या राज्यात सर्व प्रजा धन धान्याने परिपूर्ण राहो आणि तसे ठेवण्याची क्षमता शासनकर्त्याला मिळो. तो एकार्थी लक्ष्मी मातेचा वरदहस्त मानला जातो. म्हणून त्याची रचनादेखील वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे आढळते. 

महाभारतातही आहे राजदंड दिल्याचा दाखला 

रामायण-महाभारताच्या कथांमध्ये असे वारसाहक्क सोपवल्याचे उल्लेख आढळतात. या कथांमध्ये मुकुट घालणे, मुकुट परिधान करणे हे सत्ता सोपवण्याचे प्रतीक म्हणून वापरलेले दिसते, पण त्यासोबतच एक धातूची काठीही राजाला देण्यात येत, ज्याला राजदंड असे म्हणत असत. महाभारतात युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या वेळीही याचा उल्लेख आहे. शांतीपर्वात त्याविषयी सांगताना 'राजदंड हा राजाचा धर्म आहे, प्रजेचे रक्षण आणि आर्थिक सुबत्ता आणणे हे त्याचे कर्तव्य मानले जाते. तसे करण्यासाठी तो वचनबद्ध असतो.' राजदंड हे राजाच्या स्वैराचाराला आळा घालण्याचे साधनही आहे. महाभारत काळात महर्षी व्यासांनी तो धर्मराज युधिष्ठिराला सोपवला होता. 

दंड हा शिक्षेसाठी सुद्धा वापरला जातो. राजाची प्रजा गुण्यागोविंदाने नांदावी म्हणून त्याची न्यायव्यवस्था चोख असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. राजाने निःपक्षपातीपणे दोन्ही गटांची बाजू ऐकून मगच न्यायनिवाडा करायला हवा आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा देऊन राज्यात समता, बंधुता, शांतता प्रस्थापित केली पाहिजे. यासाठी त्याच्या हाती असलेली शक्ती म्हणजे राजदंड! मात्र राजाचे सगळेच निर्णय योग्य असतील असे नाही. आताच्या काळात जसे सर्वोच्च न्यायालय असते तसे त्याकाळात धर्मगुरूंना ते स्थान होते. राजाकडे उचित न्याय न मिळाल्यास प्रजा धर्मगुरुंकडे फिर्याद करू शकत असे. म्हणून राजदंड राजाच्या हाती असला तरी ते सोपवणारे धर्मगुरू राजाहून श्रेष्ठ मानले जात असत. राज्याच्या कारभारात ते ढवळाढवळ करत नसत, परंतु राजाकडून काही चूक घडत असल्याचे कळताच त्या विषयात हस्तक्षेप करून न्यायदान करत असत. 

असाच राजदंड नव्या संसद सदनाला आणि १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशाला पुनश्च मिळाला आहे. त्यामुळे देशात सुबत्ता, शांतता आणि वैभवसंपन्नता प्रस्थापित होईल अशी आशा बाळगूया!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी