शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

गजानन महाराजांची प्रसन्न मूर्ती आणि गुरुवारी खिचडी व झुणका भाकरीचा प्रसाद; पावसचे मंदिर तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:40 IST

शेगावीचा राणा अशी ओळख असलेले गजानन महाराज रत्नागिरीजवळ पावस येथे एका सुंदर मंदिरातही विसावले आहेत; त्या मंदिरात एकदा नक्की जाऊन या.

>> मकरंद करंदीकर 

आपल्या हिंदू धर्मातील मंदिरे, मठ, तीर्थस्थाने याबद्दल अनेक दंतकथा, कथा, त्याबद्दलचे काही किस्से आपण ऐकतो. रत्नागिरी शहरापासून, पावस मार्गावर फक्त १२ कि.मी. अंतरावर, श्री संत गजानन महाराजांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराबद्दलही असेच काही आश्चर्यकारक व योगायोगाचे किस्से ऐकायला मिळतात.

सध्याच्या युगात प्रत्येक जण अनेक प्रश्न, संकटे आणि अडचणीने गांजलेला असतो. त्यावर बहुतेक सामान्य संसारी माणूस हा देवधर्मातून, भक्तीमार्गाने उपाय शोधत असतो. शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांचा भक्त परिवार देश विदेशात खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. अलीकडे आपण खूप मोठमोठ्या श्रीमंत देवस्थानांमधील गैरप्रकारांबद्दल बातम्या वाचतो. पण गजानन महाराज यांच्या शेगाव येथील देवस्थानचे व्यवस्थापन, स्वच्छता, शिस्त, भक्तमंडळींच्या उत्तम व्यवस्थेची मात्र  आपण खूप चांगली वर्णने ऐकतो. गजानन महाराजांच्या अन्यत्र असलेल्या मंदिरातही तीच शिस्त, स्वच्छता, पारदर्शकता, भक्तांची स्वयंशिस्त आढळून येते.

रत्नागिरी नजिकच्या गोळप या ठिकाणी असलेले गजानन महाराजांचे मंदिर असेच अत्यंत प्रशस्त स्वच्छ आणि भव्य आहे. मंदिराच्या भोवती चारही बाजूंना पाण्याचे छोटे खंदक आहेत. हे मंदिर २०१६ मध्ये सुरू झाले. सकाळी ६ll ते रात्री ७ll पर्यंत हे मंदिर दर्शनार्थ खुले असते. गुरुवारी खिचडी व झुणका भाकरीचा प्रसाद असतो.  

मूळचे या गावातील आणि  मुंबईतील रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करणारे कै. वसंतराव गोगटे हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या मनात या ठिकाणी गजानन महाराजांचे मंदिर  बांधण्याची खूप इच्छा होती. त्यांच्या येथील घरात जायला, कोकणातील खालची आळी, वरची आळी या रचनेप्रामाणे जेमतेम पायवाट होती. तरीही १९८६ मध्ये, शेगावची महाराजांची पालखी, हत्ती घोड्यांसह त्यांच्या घरी आली. आता महाराजच येथपर्यंत आले आहेत तर त्यांचे कायमस्वरूपी मंदिर येथे व्हायला हवे, असे त्यांना तीव्रपणे वाटू लागले. पण सर्व गोष्टी आणि याचे आर्थिक गणित जमवायचे कसे हा प्रश्न होता. या वसंतराव गोगटे यांना गजानन महाराजांच्या चरित्रावर निघालेल्या दूरदर्शन मालिकेमध्ये, साक्षात गजानन महाराजांचेच काम करण्याची सुसंधी लाभली. हाच गजानन महाराजांचा आदेश आहे, इच्छा आहे असे मानून त्यांनी त्यांना मिळालेले त्याचे सर्व मानधन या कामासाठी दिले व सुरुवात केली. या  प्रचंड खर्चासाठी त्यांचा हा एक अत्यंत पवित्र असा हातभार होता. त्यांचे पुतणे श्री. माधव गोगटे हे आता या मंदिराची व्यवस्था पाहतात. 

 या मंदिराच्या प्रांगणात, गजानन महाराजांची, एक पाय खाली सोडून बसलेल्या सुप्रसिद्ध छबितील, एक प्रचंड म्हणजे सुमारे १८ फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. असे कळले की ही मूर्ती खरे तर माहिमच्या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात बसविण्यासाठी तयार करण्यात आली होती. पण तेथे कांहीं तांत्रिक कारणामुळे ते शक्य न झाल्याने, त्या मूर्तीचा स्थानापन्न होण्याचा योग मात्र या गोळपच्या मंदिरात होता हे खरे !  या मंदिरातील गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन तर अगदी हमरस्त्यावरून जातांना सुद्धा सहजपणे होते. मुख्य मंदिराशेजारी पठण, पारायण, कीर्तन, प्रवचन इत्यादींसाठी एक प्रशस्त सभागृह बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. श्री गजानन महाराजांचे जगभर पोचलेले, 'श्री गजानन विजय ' हे चरित्र लिहिणारे दास गणू महाराज ( सहस्रबुद्धे) यांची मूळ वास्तू आणि विठ्ठल मंदिर रत्नागिरीनजिकच्या  कोतवडे येथे आहे, हा सुद्धा एक योगच म्हणायचा ! इथली  प्रसन्नता आणि पावित्र्य याचा अनुभव घेण्यासारखा आहे.

ll गण गण गणात बोते ll

टॅग्स :Gajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरGajanan Maharajगजानन महाराजfoodअन्नRatnagiriरत्नागिरीPawasपावस