साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन५ ते ११ ऑक्टोबर===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १: (राशी मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी काही अडचणींचा आणि अडथळ्यांचा असणार आहे. कदाचित संभाषण व्यवस्थित होणार नाहीत, व्यवहार चोख होणार नाहीत. ताणतणाव जास्त जाणवू शकतो. पण या सगळ्यात, थोड्या प्रमाणात तुम्ही पुढे वाढणार आहात. परिस्थिती तुमच्या हातात नसेल पण मनःस्थिती नक्कीच तुमची तुम्हीच सुधारू शकता!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सकारात्मकतेचा कस लावावा लागणार आहे. तुम्ही स्वतःच स्वतःला बांधून घेतले आहे का याकडे लक्ष द्या. न्यूनगंड बाळगू नका. हातपाय गाळून बसू नका. तुमच्याकडे कौशल्य आहे, शक्ती आहे, त्यांचा नीट वापर करा. "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!" हे तुकोबांचे वचन लक्षात ठेवा!
नंबर २: (राशी मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी पूर्णत्वाचा असणार आहे. कुठलेतरी काम एका टप्प्यापर्यंत पूर्ण होईल. काहीतरी मिळवल्याचे समाधान मिळेल. आहात त्या मार्गावर, भरपूर कष्ट करुन एखादे ध्येय साध्य होईल. घडून गेलेले बदल आता चांगल्या प्रकारे फळास येतील. एखाद्या त्रासातून, किंवा बंधनातून मुक्त व्हाल. प्रवासयोग संभवतात.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला जे मिळेल ते मोठ्या मनाने स्वीकारण्याची गरज आहे. संकुचित वृत्ती सोडून व्यापक विचार ठेवा. सगळ्यांना सामावून घ्या. तुम्हाला जितके शक्य असेल तितके आनंदी मनाने एखाद्या गरजवंताला दान करा. सामाजिक कार्य करा. "जीना इसी का नाम है!" या गाण्याचे बोल आठवा आणि त्याप्रमाणे वागा!
नंबर ३: (राशी वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी निवांत वेळ घेऊन येत आहे. तुमच्या आवडीचं काहीतरी करु शकाल. मागे केलेल्या कष्टाचे फळ काही प्रमाणात मिळेल. उत्साह राहाल. लहानसा उत्सव साजरा कराल. समारंभामध्ये सहभागी व्हाल किंवा तुम्ही स्वतः आयोजन कराल. तुमच्या आवडीच्या लोकांशी भेटी होतील. एकमेकांना सहाय्य कराल. तब्येत सुधारेल.
तुम्ही काय करावे?या आठवडयात तुम्ही एकटे राहू नका, लोकांना भेटायला जा. मन मोकळे हसा आणि मन मोकळे बोला. लागेल तशी इतरांना मदत करा. गोड बोलून माणसं जोडा. लोकांचे मत जाणून घ्या, त्यांना बोलतं करा. त्यांनी सांगितलेल्या, सुचवलेल्या गोष्टींवर लक्ष द्या. तुमच्या जवळच्या माणसांशी आवर्जून संवाद साधा. स्वार्थबुद्धी सोडा.
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.
Web Summary : This week's tarot reading suggests challenges for some, completion and rewards for others, and joyful connections for many. Focus on positivity, embrace opportunities, and nurture relationships for a fulfilling week ahead.
Web Summary : इस सप्ताह का टैरो राशिफल कुछ के लिए चुनौतियां, कुछ के लिए पूर्णता और पुरस्कार, और कई लोगों के लिए खुशी के संबंध बताता है। सकारात्मकता पर ध्यान दें, अवसरों को अपनाएं और आगे एक संतोषजनक सप्ताह के लिए रिश्तों को पोषित करें।