साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १: (राशी: मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी लोकांकडून मदत आणि पाठिंबा घेऊन येत आहे. इतरांवर अवलंबून असलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. जुने मित्र किंवा नातेवाईक, मदतीसाठी तयार असणारे सज्जन लोक तुम्हाला भेटतील. एखादी लहान भेटवस्तू मिळेल. हा आनंदाचा उत्सव तुम्हाला शाबासकीतून कौतुक आणि आधार देईल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही लोकांशी सलोखा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्या जवळच्या माणसांना तुमचं म्हणणं मोकळेपणाने सांगा, त्याने तुमचं नातं घट्ट व्हायला मदत होईल. घरातल्यांसोबत निवांत वेळ घालवा. जुन्या आठवणी ताज्या करा. मन जिंकून जग जिंका. नकारात्मक गोष्टी विसरून वर्तमान नवे रंगात मिसळा!
नंबर २: (राशी : वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी परीक्षेचा असणार आहे. तुमचा संयम, तुमचा सात्विक भाव आणि तुमची सचोटी या गोष्टींना धक्का लागण्याचे प्रसंग येऊ शकतात. कामे रखडली जातील. काही प्रमाणात हतबल झाल्यासारखं वाटू शकतं. पण गणपती बाप्पा शेवटी चांगले बदल घडवून आणतील. येणार्या पहाटेसाठी आजची रात्र गरजेचीच असते हे लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही स्वतःला कणखर बनवण्याची गरज आहे. कुठल्याही आमिषाला भुलू नका. लाचारी पत्करू नका. सात्विक मनाला योग्य वाटत नसेल ते काम अजिबात करू नका. कोणतेही नियम मोडू नका. जोखीम उचलू नका. व्यसनात गुंतू नका. अती तिथे माती हे लक्षात ठेवा! हा काळ तुम्हाला आत्मसंयम ठेवायला सांगतो आहे!
नंबर ३: (राशी मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी एक अवघड वळण घेऊन येत आहे. तुमचे कष्ट या काळात कमी प्रमाणात फलित होतील म्हणून जास्त अपेक्षा न ठेवलेल्या चांगल्या. वास्तविक परिस्थिती पेक्षा तुमची मानसिक स्थिती कशी आहे यावर तुमचा हा काळ अवलंबून राहील. म्हणून "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!" हे लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनाला येईल तसे वागायला जाऊ नका कारण त्यात तुमची चुकण्याची शक्यता जास्त आहे. कोणत्याही प्रसंगात कोणाचा तरी आधार घेऊन, सल्ला घेऊन पुढे चाला. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा तुमच्याकडे काही उत्तम आहे, काय चांगले आहे याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यावर काम करा, यश नक्कीच येईल!
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.