Swami Samartha: स्वामींच्या नित्य उपासनेसाठी रोज १० मिनिटं राखीव ठेवा, आयुष्यात मोठा बदल घडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:55 IST2025-06-05T14:51:55+5:302025-06-05T14:55:10+5:30

Swami Samartha: स्वामींची उपासना फक्त गुरुवारी नाही तर नित्यनियमाने करायला हवी आणि त्या उपासनेला शिस्त असायला हवी; कशी ते जाणून घ्या!

Swami Samartha: Reserve 10 minutes every day for daily worship of Swami, a big change will happen in your life! | Swami Samartha: स्वामींच्या नित्य उपासनेसाठी रोज १० मिनिटं राखीव ठेवा, आयुष्यात मोठा बदल घडेल!

Swami Samartha: स्वामींच्या नित्य उपासनेसाठी रोज १० मिनिटं राखीव ठेवा, आयुष्यात मोठा बदल घडेल!

स्वामी समर्थांची करेल भक्ती, मिळेल त्याला सुख, शांती आणि मुक्ती! हा आहे स्वामी समर्थांच्या उपासनेचा महिमा! अनेकांना स्वामी भक्ती करावी असे मनापासून वाटते. परंतु उपासना नेमकी कशी करावी हेच कळत नाही. अध्यात्म मार्गात उपास आणि उपासना दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उपास असो वा उपासना या देवाच्या नावे करत असलो तरी त्याचा लाभ आपल्याला होणार असतो. उपवासामुळे आपले मन बाह्य गोष्टींकडून अलिप्त होते आणि अंतर्मनाकडे झुकते. तर उपासनेमुळे मन एकाग्र होते आणि चिंता मिटते. 

Nirjala Ekadashi 2025: २४ एकादशीचे पुण्य निर्जला एकादशीत, पण उपास कधी करावा ६ की ७ जूनला? 

सद्यस्थितीत ज्यांना शक्य आहे, त्यांनी स्वामी भक्ती म्हणून गुरुवारचा उपास करावा. मात्र जे ज्येष्ठ नागरिक असतील, औषध, गोळ्या सुरू असतील, त्यांनी उपास न करता उपासनेवर भर द्यावा. जे उपास करणार असतील त्यांनी केवळ फलाहार करावा. उपासाचे पदार्थ खाण्यापेक्षा उपास न केलेला बरा. अशा वेळी उपासापेक्षा उपासना जास्त फलदायी ठरते. 

Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!

त्यासाठी दैनंदिन पूजेत पुढील गोष्टींचा समावेश करा :

>> रोज सकाळी देवपूजेसाठी १० मिनिटं राखीव ठेवा. अंघोळ झाल्यावर स्वामींसमोर शांत चित्ताने बसा. दिवा लावा. उदबत्ती लावा. स्वामींना सुगंधी फुल अर्पण करा. या प्राथमिक उपचाराने तुमचे मन शांत व एकाग्र होईल. 

>> त्यानंतर 'श्री स्वामी समर्थ' हा जप १०८ प्रमाणे ११ वेळा जपमाळ करा. ११ वेळा शक्य नसेल तर निदान १ वेळा जपमाळ करा. 

>> स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय वाचा. आठवड्याभरात पूर्ण ग्रंथ वाचून होईल. हेच रुटीन पुढच्या आठवड्यात सुरु ठेवा. 

>> अध्याय वाचून झाले की स्वामींचा तारक मंत्र म्हणा. 

>> स्वामींजवळ ठेवलेले पाणी सगळ्या घरातल्याना तीर्थ म्हणून द्या. 

अशी ही स्वामी उपासना तुम्हाला निश्चितच फलदायी ठरेल याबाबत निःशंक व्हा आणि निर्भय व्हा!

Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला खाणे तर दूरच, पण पाणीही पिऊ नये, असा नियम का?

Web Title: Swami Samartha: Reserve 10 minutes every day for daily worship of Swami, a big change will happen in your life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.