शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ऐतखाऊ गिधाडाची गोष्ट शिकवेल आयुष्यभराचा धडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 1:37 PM

आयुष्यात केवळ सुख उपभोगत राहिलात तर दुःखाची झळ सहन करायची ताकद राहणार नाही. म्हणून प्रत्येक जिवाने हर तऱ्हेच्या परिस्थितीत न डगमगडता परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे.

गिधाडांची प्रजाती आता दुर्मिळ होत चालली आहे. शहरी भागात तर त्यांचे दर्शन सहसा होत नाहीच. मात्र एकदा जंगलात राहणारा गिधाडांचा एक समूह जंगलतोड होऊ लागल्याने उडत उडत एका निर्मनुष्य बेटावर पोहोचला. ते बेट निर्मनुष्य असले, तरी सागरी जीव, वन्य जीव तिथे मुबलक प्रमाणात होते. गिधाडांनी विचार केला काही काळ इथेच मुक्काम करू. 

जेवणाची, राहण्याची उत्तम सोय झाल्याने गिधाडं त्या वातावरणाला सरावली. त्यांच्यातल्या तरुण गिधाडांनी तर आमरण इथेच राहायचे असा संकल्प केला. तेव्हा बुजुर्ग गिधाड म्हणाले, तशी चूक कदापिही करू नका. आज इथे आयते अन्न मिळत आहे, भविष्यात मनुष्याने इथेही अतिक्रमण केले तर कुठे जाल?'त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ऐतखाऊ तरुण गिधाड जनावरांच्या मांसाचे लचके तोडत होते. 

काही काळाने बुजुर्ग गिधाडाने मुक्काम हलवायचा ठरवला. त्याच्याबरोबर दोन चार जुने साथीदार आले. त्यांना आपल्या प्रजातीची काळजी वाटू लागली. आपण आयुष्यभर कष्ट करून, अन्न शोधून आपली उपजीविका भागवली, पण या तरुणांना सगळे आयते मिळत राहिले तर यांना कठीण प्रसंगाची जाणीव कशी होणार? ते स्वत्व गमावून बसतील आणि सुस्त होऊन निकामी होतील. परंतु समजूत काढूनही कोणी त्यांची साथ न दिल्याने उरलेली गिधाडे बेटावर राहिली, बाकीची दुसऱ्या जंगलात निघून गेली.

 

काही काळाने आपल्या नातलगांच्या भेटीने बुजुर्ग गिधाडे बेटावर परत आली. तिथे पाहतो तर काय आश्चर्य? जवळपास सगळी गिधाडे मरणासन्न अवस्थेत पडली होती. त्यांची विचारपूस केली असता, जीर्ण आवाजात तो तरुण गिधाड म्हणाला, 'आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमचे ऐकले नाही त्याची शिक्षा आज भोगत आहोत. तुम्ही सांगीतल्या नुसार एकदिवस एक जहाज या बेटावर आले आणि त्या जहाजातून बिबटे सोडण्यात आले. त्यांनी इथले सगळे जीव खाऊन पोटं भरली आणि आम्ही उडण्याची क्षमता गमावून बसलो आहोत, प्रतीवर करण्याची आमच्यात ताकद राहिलेली नाही हे ओळखून त्यांनी आमच्यावरही वार केला.'

बुजुर्ग गिधाडाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही क्षणाच्या लोभापायी ही गिधाडं ऐन तारुण्यात आपला आनंद गमावून बसली. आपली प्रजाती नष्ट झाली. ऐतखाऊपणा यांना नडला! आयुष्यात केवळ सुख उपभोगत राहिलात तर दुःखाची झळ सहन करायची ताकद राहणार नाही. म्हणून प्रत्येक जिवाने हर तऱ्हेच्या परिस्थितीत न डगमगडता परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे. तसेच एकाच ठिकाणी चिकटून न बसता नवनवे अनुभव घेत आयुष्य समृद्ध केले पाहिजे.