शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

स्वप्नात पैसे दिसणं याचा अर्थ काय? तुमचं भाग्य बदलुही शकतं...पाहा स्वप्नशास्त्र काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 21:10 IST

आपण स्वप्नात जे पाहतो त्याचा आपल्या वास्तविक जीवनाशी नक्कीच काहीतरी संबंध असतो. स्वप्ने आपल्याला येणाऱ्या भविष्याची झलक देतात, असेही म्हटले जाते. स्वप्नशास्त्रात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

गाढ झोपेत असताना स्वप्न पडणे ही सर्वसामान्य बाब आहे. स्वप्ने ही कशीही असू शकतात? काही लोकांना चांगली स्वप्ने पडतात, तर काहींना वाईट स्वप्ने पडतात. स्वप्नशास्त्र सांगते की, आपण स्वप्नात जे पाहतो त्याचा आपल्या वास्तविक जीवनाशी नक्कीच काहीतरी संबंध असतो. स्वप्ने आपल्याला येणाऱ्या भविष्याची झलक देतात, असेही म्हटले जाते. स्वप्नशास्त्रात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना पैशाशी संबंधित स्वप्ने पडतात. पैशाशी संबंधित स्वप्नांचा काय अर्थ असतो, याबाबत भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी News 18 हिंदीला माहिती सांगतली आहे.

स्वप्नात पैसे मिळणे -स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळताना किंवा कोणी तुम्हाला पैसे किंवा नोट देताना दिसले तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. असे मानले जाते की, या प्रकारचे स्वप्न भविष्यातील आर्थिक लाभाचे संकेत देते. तसेच, हे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचेही लक्षण असू शकते.

स्वप्नात लॉटरी लागणे -जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात लॉटरी जिंकण्याचे स्वप्न पाहिले, ज्यामध्ये त्याने भरपूर पैसे जिंकले आहेत, तर यावरून हे सूचित होते की, तुमच्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत. याशिवाय जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचते.

रस्त्यात पैसे मिळाल्याचे स्वप्न -जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात वाटेत पडलेले पैसे सापडल्याचे दिसले, तर हे स्वप्न तुमच्यासाठी सकारात्मक असेल. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. यामुळे भविष्यात तुमची आर्थिक अडचण दूर होईल आणि पैसे कमवण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होतील.

स्वप्नात पैसे गमावणे -स्वप्नात पैसे गमावणे किंवा जुगारात पैसे गमावणे हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, आपण सतत आपला आत्मविश्वास गमावत आहात किंवा अशी एखादी महत्त्वाकांक्षा आहे, जी बर्याच काळापासून अपूर्ण आहे. या व्यतिरिक्त, या स्वप्नाचा आणखी एक अर्थ असा असू शकतो की सामान्य जीवनात कोणीतरी तुम्हाला पैशाच्या बाबतीत फसवू शकते.

स्वप्नात पैसे चोरणेस्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात पैसे चोरत असाल किंवा तुमचे पैसे चोरीला गेले तर तुम्हाला वास्तविक जीवनात खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचा पार्टनर तुमच्या व्यवसायात किंवा एखाद्या प्रकल्पात तुमची फसवणूक करणार आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे स्वप्न पडले असेल तर तुम्ही बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देणे सुरू केले पाहिजे.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष