शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

आठवड्याची सुरुवात 'या' दोन गोष्टींनी करा, जेणेकरून अपयशाचे तोंड बघावे लागणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 8:00 AM

दुसऱ्यांशी तुलना करण्यात किंवा दुसऱ्यांचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ सार्थकी लावा!

यशस्वी व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, आपल्या यशात अडथळे आणण्यास आपणच जबाबदार आहोत, हे मात्र आपल्याला काही केल्या उमगत नाही. आपल्या अपयशासाठी आपण दुसऱ्याला दोष देत राहतो. लेखक व. पु. काळे म्हणत, 'माणूस अपयशाला भीत नाही, तर अपयशाचे खापर फोडायला कारण मिळाले नाही, तर तो अस्वस्थ होतो!' म्हणून स्वतःच्या यशाची किंवा अपयशाची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. दुसऱ्याने कसे वागावे याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ स्वतःला घडवण्यावर खर्च करा आणि दोन वाक्यांची आयुष्याला जोड द्या. तुमचे आयुष्य बदलून जाईल. 

१. आजचे काम उद्यावर ढकलू नका : जेव्हा एखादे काम आपल्याला मनापासून करावेसे वाटते, ते सुरू करण्यासाठी आपण नेहमी उद्यापासून सुरुवात करण्याची योजना आखतो. इंग्रजीत म्हण आहे, 'टुमॉरो नेव्हर कम' उद्या कधीच उगवत नाही. हिंदीतही म्हणतात, 'कल करे सो आज कर, आज करे सो अब' म्हणजेच कामाची चालढकल करू नका. जेव्हा आपण उद्यापासून सुरुवात करू म्हणतो, तेव्हा आजची जबाबदारी झटकत असतो. कामाची टाळाटाळ करत असतो. आपले मन त्या कामाची जबाबदारी झटकत असते त्यामुळे मेंदूलाही ते काम न करण्याची सूचना मिळते आणि काम कधीच सुरू होत नाही. म्हणून जी गोष्ट मनात आहे, ती मनात आल्याबरोबर त्यावर लगेच काम सुरू करा. उदा. व्यायामाची सुरुवात करायची आहे. पण हा विचार रात्री मनात आला, तर सुरुवात नक्कीच उद्यापासून होईल, परंतु रात्री प्रत्यक्ष व्यायाम शक्य नसला, तरी किमान शतपावलीने मी माझ्या ठरवलेल्या कामाची सुरुवात केली, याची जाणीव मेंदूला होते आणि दुसऱ्या दिवसापासून मेंदू स्वतः तुम्हाला तुमच्या नियोजित कामाची सूचना देतो. वेळ कधीच गेलेली नसते, तिचा वापर योग्य प्रकारे करावा लागतो आणि कामाला उद्यापासून नाही, तर आजपासून सुरुवात करावी लागते. 

२. जे करेन ते चांगलेच करेन : व्यक्तीची ओळख त्याच्या कर्तृत्वावरून होत असते. ज्याचे काम चांगले त्याला दाम अधिक मिळतो. दोन पैसे अधिक गेले तरी चालतील, पण काम चांगले झाले पाहिजे, अशी आपली मानसिकता असते. याचाच अर्थ चांगल्या कामाला चांगला मोबदला मिळतो आणि चांगल्या कामाची प्रत्येक जण दखल घेतो. म्हणून लहानात लहान काम करताना सुद्धा ते इतके पद्धतशीरपणे करा, की लोकांना तुमची दखल घ्यावीच लागेल. काम करताना प्रामाणिकपणे करा. आपल्याकडून १०० टक्के कसे देता येतील, याचा विचार करा. माणसांची पारख त्याच्या गुणांवरून होते. छोट्या छोट्या सवयीवरून होते. म्हणून उरकून टाकण्याची सवय सोडून द्या. स्वतःला बजावून सांगा, 'चलता है, नही चलेगा!' कोणी माझे काम पाहो न पाहो, मला माझे काम आवडले पाहिजे, मला माझ्या कामाचे समाधान मिळाले पाहिजे. एवढी प्रामाणिकता अंगी बाणली, तरी यशापासून आपल्याला कोणीही दूर ठेवू शकणार नाही. 

हे दोन्ही प्रयोग आजपासून सुरू करा. अगदी आतापासून...!