शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘अभंगरंगा’तून विठूरायाच्या दर्शनाची स्वरानुभूती; महेश काळे यांच्या जादुई स्वरात ऑनलाइन वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:03 IST

महेश काळे यांच्या स्वरचैतन्याने घरबसल्याच भाविकांना वारीची अनुभूती मिळाली. ‘बोलावा विठ्ठल’,  ‘विष्णुमय जग’, ‘जाता पंढरीसी’, ’संतभार पंढरीत’ अशा एकसे बढकर एक भक्तिरचनांद्वारे मैफलीने कळसाध्याय गाठला

पुणे : चराचरात भरून राहिलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची स्वरानुभूती ‘लोकमत’च्या ‘अभंगरंग’ या ऑनलाइन कार्यक्रमातून भक्तांना मिळाली. महेश काळे यांच्या जादुई स्वरांनी भाविकांना वारीदर्शन घडविले. विठूनामाच्या गजरात भाविक तल्लीन होऊन गेले.लोकमत माध्यम समूह आयोजित आणि संतोष बारणे प्रस्तुत (सिल्व्हर ग्रुप) आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (३० जून) महेश काळे यांच्या अभंगवाणीतून भक्तिरसाचा जणू मळाच फुलला. द आराहना रोझरी फाउंडेशन पुणेच्या सहयोगाने ही मैफल रंगली.महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंग-रखमाईला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासह राज्यभरातून पालखी सोहळ्यांनी मंगळवारी प्रस्थान ठेवले.

यंदाच्या वर्षी कोरोनाच्या टाळ-मृदंगाची साथ नव्हती. मात्र, ‘लोकमत’च्या अभंगरंगातून महेश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जादुई स्वरांच्या बरसातीत व्हर्च्युअल वारीचे दर्शन घडले. देहू-आळंदीतील प्रस्थानापासूनच्या प्रथा-परंपरांचे दर्शन घडवत ही जादुई मैफल सुरू होती. संपूर्ण जगभरातून भाविक यामध्ये सहभागी झाले होते. लाखांहून अधिक भाविकांनी ‘लोकमत’च्या ऑनलाइन सोहळ्यावर कौतुकाची पखरण केली आणि ‘लोकमत’च्या टीमसह महेश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न सुफळ झाले.भाविकांनी अनुभवले भक्तिरसाचे चैतन्यमहेश काळे यांच्या स्वरचैतन्याने घरबसल्याच भाविकांना वारीची अनुभूती मिळाली. ‘बोलावा विठ्ठल’,  ‘विष्णुमय जग’, ‘जाता पंढरीसी’, ’संतभार पंढरीत’ अशा एकसे बढकर एक भक्तिरचनांद्वारे मैफलीने कळसाध्याय गाठला. ‘अबीर गुलाला’चे रंग उडवीत वारीचा तो चैतन्यमयी सोहळा रसिकांनी सुरांमधून अनुभवला. ‘वारी’ म्हणजे नक्की आहे तरी काय तर विवेकाच्या मार्गाने अर्थ शोधणारी एक शक्ती आहे. विठ्ठलाच्या भक्तीचा खळाळता प्रवाह वारीतून अनुभवायला मिळतो, अशा सुंदर शब्दांत योगेश देशपांडे यांनी या मैफलीचे विवेचन केले.विठूनामाचा ऑनलाइन गजर रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. मीही वारकरी असून माझे कुटुंब वारीमध्ये सहभागी होत असते. यंदा कोरोनामुळे पंढरीच्या वारीमध्ये जरी खंड पडला असला, तरी लोकमतच्या सहकार्याने ही ऑनलाइन वारी रसिकांसमोर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. - संतोष बारणे, सिल्व्हर ग्रुपकोरोना संकटाच्या काळातही महाराष्ट्राच्या वारीच्या अद्वितीय परंपरेला ‘अभंगरंग’मधून जपण्यात आले. भाविकांची विठ्ठलदर्शनाची आस पूर्ण झाली. लाखो भाविकांच्या कौतुकाच्या पखरणीत रंगलेल्या या सोहळ्यात रोझरी फाउंडेशनच्या सहभागाचा आनंद आहे. - विनय अरहाना, रोझरी फाउंडेशन

टॅग्स :Mahesh Kaleमहेश काळेLokmatलोकमतPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी