Somvati Amavasya 2024: 'या' कृष्णमंत्रात आहे प्रचंड ताकद; आजपासून जप सुरु करा नवीन वर्ष चांगले जाईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:37 IST2024-12-30T14:33:38+5:302024-12-30T14:37:47+5:30
Somvati Amavasya 2024: आज सोमवती अमावस्या आहे, आजच्या दिवशी शिवपूजेबरोबर दैनंदिन उपासनेत दिलेल्या मंत्र जपाची सुरुवात करा; लाभ होईल!

Somvati Amavasya 2024: 'या' कृष्णमंत्रात आहे प्रचंड ताकद; आजपासून जप सुरु करा नवीन वर्ष चांगले जाईल!
हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला Soamvati Amavaya 2024 अतिशय महत्त्व आहे. आजच्या दिवशी चंद्राची आणि भालचंद्राची अर्थात महादेवाची उपासना केली जाते, हे आपण जाणतोच. मात्र दोन दिवसात आपण नवीन इंग्रजी वर्षात पदार्पण करणार आहोत. त्यादृष्टीने नववर्षाची ()सुरुवात चांगली व्हावी यासाठी विशेष उपाय दिला आहे ज्योतिष अभ्यासक पालघर येथील सचिन मधुकर परांजपे यांनी!
आज सोमवती अमावस्या आहे. आजपासून कोणताही शुभ मानस संकल्प करुन अर्थात चांगली इच्छा मनात धरून दिलेल्या श्रीकृष्ण मंत्राचा जमेल तसा आणि जमेल तितका जप दररोज थोडा वेळ तरी सुरु करुया. हा मंत्र मनःशांती व रोगनाश करुन, मनातील भयगंड, आळस दूर करणारा दिव्य मंत्र आहे. रोज जप करा. त्यासाठी कोणतेही बंधन नाही. हे चालेल का? ते चालणार नाही का? हे विचारच मनात आणू नका.... तुमच्या व्यक्तिमत्त्वातील जे जे चुकीचे, अप्रिय आहे ते ते आपसूकच गळून पडेल. दोन दिवसात इंग्रजी नववर्ष सुरु होते आहे. नवीन वर्षांची सुरुवात चांगली व्हावी म्हणून आजपासूनच दिलेली उपासना सुरु करा. त्यासाठी उपयुक्त मंत्र कोणता?
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने,
प्रणत क्लेशनाशाय गोंविंदाय नमो नमः!!
या श्लोकाचा अर्थ असा आहे, की वासुदेवाचा सुपुत्र श्रीकृष्ण हा परमात्मा आहे आणि तो आपल्या सर्वांची काळजी मिटवणारा तसेच दुःख, दैन्य दूर करणारा आहे. त्या कृष्णाला मनापासून अभिवादन!
असा हा दोन ओळींचा पण महत्त्वाचा श्लोक रोज म्हणायला सुरुवात करा. जेणेकरून व्यसनमुक्ती किंवा कोणतेही संकल्प असतील तर तेही पूर्ण होतील.... रोज अगदी पाचवेळा जप केला तरी चालेल... अधिकस्य अधिकं फलं.... १००८ केला तर उत्तम.... स्थळकाळ, वय, लिंग, शाकाहार-मांसाहार, मासिक पाळी, सोयरसुतक कोणतंही बंधन नाही... प्रवासात तर आवर्जून जप करा.