शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 14:50 IST

Som Pradosh 2024: पितृपक्षाच्या काळात ३० सप्टेंबर रोजी येणारे सोम प्रदोष व्रत अजिबात चुकवू नका; वाचा सविस्तर माहिती.

प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय. त्यात सध्या पितृपक्ष सुरू असल्याने या तिथीचे महत्त्व दुपटीने वाढले आहे. पितृपक्षातील श्राद्धविधी केल्याने पितरांचे आशीर्वाद आणि सोम प्रदोष व्रत केल्याने महादेवाचे आशीर्वाद प्राप्त होतील. देवाधिदेव महादेव स्मशानवासी असल्याने पितरांचा आणि महादेवाचा जवळचा संबंध आहे. यानिमित्ताने दोन्हीचे एकत्र पूजन कसे करायचे ते जाणून घेऊ. ३० सप्टेंबर रोजी  सोमवारी प्रदोष  येत असल्याने तिला सोम प्रदोष म्हटले जाईल. ही शिव उपासकांसाठी संधी आहे. प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला (संध्याकाळी) सूर्यास्ताच्या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते. 

प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. सोमवारी आगमन झाल्यामुळे त्याला सोम प्रदोष म्हणतात. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. सोम प्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सोम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. 

पौराणिक कथा : असे म्हणतात, की हे व्रत सर्वप्रथम चंद्र देवाने केले होते. त्याला क्षयरोग झाला होता. भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला. या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोम प्रदोषाच्या दिवशी उपास करुन पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपास सोडावा. 

सोम प्रदोषामागे आणखीही एक व्रत कथा सांगितली जाते- 

एक विधवा स्त्री स्वतःचे व मुलाचे पालन पोषण करण्यासाठी दारोदार भीक मागत असे. मिळालेल्या अन्नातून दोघांचे पोषण होत असे. एक दिवस भीक मागत फिरत असताना तिला जखमी अवस्थेत एक मुलगा सापडला. तिला त्या मुलाची दया आली. तिने त्याला आपल्या सोबत झोपडीत नेले. त्यालाही घासातला घास खाऊ घातला. तो मुलगा बरा झाला. त्याने स्वतःची ओळख पटवून दिली. तो एका राज्याचा राजकुमार होता. परंतु शत्रूने त्याच्या राज्यावर आक्रमण करून त्याच्या वडिलांना बंदिवान केले होते. आणि त्याला राज्यातून हाकलून दिले होते. म्हणून त्याची दुरावस्था झाली होती. 

दिवस पुढे पुढे जात होते. एकदा एका गंधर्व कन्येचा राजकुमाराशी परिचय झाला आणि ती त्याच्या रूपावर लुब्ध झाली. त्याच्याशी लग्न करण्याचा तिने मनोदय व्यक्त केला. तिने आपल्या माता पित्याला तसे सांगितले. त्याची पूर्ण चौकशी करून गंधर्व कन्येच्या माता पित्याने आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. आपले सैन्य राजपुत्राला देऊन शत्रूशी लढा करण्याचे बळ दिले. राजकुमाराने आपले राज्य परत मिळवले. आई वडिलांची तुरुंगातून सुटका केली आणि ज्या स्त्रीने त्याला मदतीचा हात दिला होता, त्या स्त्रीचा राजपुत्राने सांभाळ केला आणि तिच्या मुलाला भविष्यात राज्यच्या प्रधान पद बहाल केले. ती स्त्री कायम प्रदोष व्रत भक्ती भावाने करत असल्यामुळे तिचे दिवस पालटले आणि नशिबात अनपेक्षितपणे राजयोग आला. 

सोम प्रदोष व्रतासाठी पूजेसाठी शुभ वेळ - ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.४५ पासून ७. ३४ पर्यंत. 

प्रदोष पूजा विधी : या दिवशी भाविकांनी सूर्योदयाआधी उठून स्नान करावे. घर स्वच्छ करावे. देवाची पूजा करावी. शिवलिंगावर बेल वाहावे. जमल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.  त्याचप्रमाणे महाकाल शंकराच्या महामृत्युंजय जपाचेही पठण करावे. 

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्।उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAstrologyफलज्योतिषPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३