शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Shravan Vrat 2021: संपत शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा लाभदायक का ठरते, ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 17:26 IST

Shravan Vrat 2021 : हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्यास मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे.

श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. गीतेमध्ये भगवंताने 'अश्वत्थ सर्ववृक्षाणाम' म्हणजे वृक्षांमध्ये जो अश्वत्थ आहे, तो मी आहे, असे म्हटले आहे. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची वेगवेगळी पूजा केली जाते. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिखित धर्मबोध ग्रंथात याबद्दल सविस्तर माहिती मिळते.

Shravan Vrat 2021 : साडेसातीच्या त्रासाने त्रस्त असाल, तर श्रावण शनिवारी करा `शांतिप्रद शनिव्रत!'

अनेक जण चातुर्मासात रोज नेमाने पिंपळाला प्रदक्षिणा घालून एक लाख प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प पूर्ण करतात. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असे म्हणतात. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थवृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे. पुढेही ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अश्वत्थपूजेला मान असे. यज्ञ आणि पितर अश्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले. त्याबद्दलची कथा पद्मपुराणात आढळते. 

एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णुभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवित असे. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रगटले. त्यांनी धनंजयाला `तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मला जखमा झाल्या आहेत' असे सांगितले. 

हे ऐकून दु:खी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरवले. त्याची भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी धनंजयाला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो रोज भक्तीने अश्वत्थाची पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. अशी अश्वत्थ पूजेची महती आहे.

हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्यास मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या होत्या, हे सर्वपरिचित आहे. ज्यांना नेहमी शक्य नसते, त्यांनी निदान शनिवारी, विशेषत: श्रावणी शनिवारी अश्वत्थाला अर्थात पिंपळाच्या झाडाला आवर्जून प्रदक्षिणा घालाव्यात. तसे करणे केवळ आध्यात्मिकदृष्ट्याच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायक ठरते. 

Raksha Bandhan 2021 : राशीच्या अनुकूल असेल रंगाचा धागा, तर भाऊरायाला करिअरमध्ये मिळेल सर्वोच्च जागा!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल