शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Shukrawar 2023: महालक्ष्मी आणि जिवती पूजनानिमित्त श्रावण शुक्रवारी जेऊ घाला सवाष्ण; जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:16 IST

Shravan Shukrawar 2023: लक्ष्मी पूजेच्या निमित्ताने सवाष्ण जेवू घालण्याचा आपल्याकडे प्रघात आहे, अशातच १८ ऑगस्ट रोजी श्रावणातला पहिला शुक्रवार; वाचा सविस्तर माहिती. 

यंदा १७ ऑगस्ट रोजी श्रावण सुरू झाला आणि बृहस्पती पूजनानंतर जिवतीला पुजण्याचा आणि महालक्ष्मी स्थापन करण्याचा दिवस आला. तो दिवस अर्थात श्रावण शुक्रवार. ही उपासना असते लक्ष्मीची. ती सोनपावलांनी आपल्या घरात यावी म्हणून सवाष्ण जेवू घालण्याचा प्रघात आहे. त्यामागील कारण काय तेही जाणून घेऊ. 

लक्ष्मी प्रसन्न व्हावी असे वाटत असेल तर गृहलक्ष्मी तृप्त असायला हवी, हा संसाराचा मूलमंत्र आहे. मात्र कामाच्या धबडग्यात गुंतून गेलेली 'ती' ना स्वतःकडे लक्ष देत ना कोणाचे तिच्याकडे लक्ष जात. अलीकडे आपण 'जागतिक महिला दिन' साजरा करायला लागलो, मात्र भारतीय संस्कृतीने घराघरातल्या 'ती'ची आठवण ठेवत व्रत वैकल्याच्या निमित्ताने पूर्वापार तिचा सन्मान केला आहे. कसा ते पाहू!

हॉटेलमध्ये जेवायला जाणे आताच्या काळात नाविन्यपूर्ण राहिले नाही. उठसूट जंक फूड खाणारे लोक क्वचितच घरी जेवत असतील. मात्र रोज संसार, नोकरी, मुलांच्या शाळा, अभ्यास, नवऱ्याचा डबा, घरच्यांचे जेवण, नाश्ता यात गुंतलेली गृहिणी नवऱ्याने 'बाहेर जेवायला जाऊया का?'विचारल्यावर आनंदून जाते. कारण सकाळ, दुपार, संध्याकाळ 'रांधा वाढा उष्टी काढा' करून ती दमून जाते, कंटाळून जाते. आजही ७० टक्के घरात हेच चित्र आपल्याला दिसेल. 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळम चित्रपटातून या गोष्टीची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन आयते गरमागरम जेवणे आणि त्यानंतर पसारा आवरावा न लागणे यातच तिला कोण एक आनंद असतो!

मात्र पूर्वी हॉटेलमध्ये जेवणे असभ्यपणाचे लक्षण मानले जाई. घरातले पुरुष हॉटेलात जात नसत तर स्त्रियांचे जाणे दूरच! सगळ्यांना गरमागरम जेवण वाढणारी, दुसऱ्यांच्या आवडी निवडी जपणारी ती आयते जेवण मिळण्यापासून वंचित राही. अशा अन्नपूर्णेलाही पहिल्या पंगतीचा मान मिळावा म्हणून धर्मशास्त्राने सण उत्सवाच्या निमित्ताने सवाष्ण जेवू घालण्याची प्रथा सुरु केली असावी. 

सण उत्सवाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या घरी बोलावल्यावर जेवायला जायचे, पाटावर आयते बसायचे, यथेच्च जेवायचे आणि तृप्ततेची ढेकर द्यायची, हा आनंद कोणत्याही संसारी स्त्रीसाठी शब्दातीत असतो. तसेही रोज रोज आपल्याच हातचे जेवून तिला कंटाळा येतो, म्हणून या निमित्ताने झालेली चवबदल तिला रुचते! हॉटेलमध्ये एखादी पोळी, रोटी, नान एक्ट्रा घेतली तरी तिचे वरचे पैसे मोजावे लागतात, याउलट जेवायला मानाने बोलावल्यावर अगत्याने, प्रेमाने, आपुलकीने पोळीचा, भाताचा, गोडाचा आग्रह केला जातो. त्या पाहुणचाराने ती सुखावते आणि मनापासून आशीर्वाद देते. या सदिच्छा ज्याला आजच्या काळात आपण 'पॉझिटिव्ह वाइब्स'' म्हणतो, त्या संबंधित वास्तूला लाभदायी ठरतात. तृप्त झालेला आत्माच या सदिच्छा देऊ शकतो.

 म्हणून आपल्या संस्कृतीत अन्नदानाला महत्त्व दिले आहे. भुकेल्या माणसाला अन्न आणि पैसे यातून काय निवडणार विचारले, तर तो अन्न निवडेल. कारण पैसे कधीही कमवता येतात, मात्र दोन वेळेची भूक शमवता येत नाही. 

गृहिणीला स्वगृही जेवण मिळतेच. पण अशा पद्धतीने केलेला तिचा आदरसत्कार तिला नवीन ऊर्जा, उत्साह आणि प्रसन्नता देतो. म्हणून सण उत्सवाला तिला जेवू घालणे हे तिचे माहेरपण करण्यासारखेच असते. 

धर्मशास्त्राने प्रत्येक समाज घटकाचा दूरदृष्टीने केलेला विचार पाहता आपल्या संस्कृतीबद्दल असलेला अभिमान दुणावतो. म्हणून आपणही ही उद्दात्त संस्कृती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली पाहिजे. आणि आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला पाहिजे. तर मग यंदा जिवतीच्या आणि महालक्ष्मीच्या पूजेनिमित्त पुरणा-वरणाचा स्वयंपाक जेवायला कोणत्या सखीला आमंत्रित करताय?

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल