शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

Shravan Shaniwar 2023: श्रावण शनिवारी करा अश्वत्थमारुतीची पूजा; वाचा व्रतविधी आणि त्यामुळे होणारे अनेक लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 10:35 IST

Shravan Shaniwar Vrat 2023: २६ ऑगस्ट रोजी श्रावण शनिवार आहे, त्यालाच संपत शनिवार असेही म्हणतात; यादिवशी अश्वत्थ मारुतीची पूजा केल्याने होणारे लाभ जाणून घ्या.

श्रावणातील प्रत्येक शनिवारी (Shravan Shaniwar 2023)अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. गीतेमध्ये भगवंताने 'अश्वत्थ सर्ववृक्षाणाम' म्हणजे वृक्षांमध्ये जो अश्वत्थ आहे, तो मी आहे, असे म्हटले आहे. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची वेगवेगळी पूजा केली जाते. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिखित धर्मबोध ग्रंथात याबद्दल सविस्तर माहिती मिळते.

अनेक जण चातुर्मासात रोज नेमाने पिंपळाला प्रदक्षिणा घालून एक लाख प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प पूर्ण करतात. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असे म्हणतात. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थवृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे. पुढेही ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अश्वत्थपूजेला मान असे. यज्ञ आणि पितर अश्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले. त्याबद्दलची कथा पद्मपुराणात आढळते.

एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णुभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवित असे.एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रगटले. त्यांनी धनंजयाला `तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मला जखमा झाल्या आहेत' असे सांगितले.

हे ऐकून दु:खी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरवले. त्याची भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी धनंजयाला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो रोज भक्तीने अश्वत्थाची पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. अशी अश्वत्थ पूजेची महती आहे.

हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्यास मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या होत्या, हे सर्वपरिचित आहे. ज्यांना नेहमी शक्य नसते, त्यांनी निदान शनिवारी, विशेषत: श्रावणी शनिवारी अश्वत्थाला अर्थात पिंपळाच्या झाडाला आवर्जून प्रदक्षिणा घालाव्यात. तसे करणे केवळ आध्यात्मिकदृष्ट्याच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायक ठरते.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल