शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण संकष्टी चतुर्थी: कसे कराल व्रत? बाप्पाची कृपा, इच्छा होईल पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 09:06 IST

Shravan Sankashti Chaturthi 2024: गणेशोत्सवापूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. व्रताचे महात्म्य आणि विविध शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घ्या...

Shravan Sankashti Chaturthi 2024: अगदी काही दिवसांनी गणेशोत्सव सुरू होत आहे. गणेश चतुर्थीची काहीशी लगबग सुरू झाली आहे. डेकोरेशन कसे करावे, यंदा वेगळे काय करावे, याची चाचपणी सुरू झाली आहे. त्याआधी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली गेली आहे. चातुर्मासातील श्रावण मासात व्रत-वैकल्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. श्रावणातील संकष्ट चतुर्थी व्रतपूजन, प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळा जाणून घेऊया...

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. श्रावणातील वद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते. 

विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो

संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे.  मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.

कान्हासाठी यशोदामातेने केले होते संकष्टी व्रत

भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे. श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चारचौघा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदामातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही ईच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव आहे. या दिवशी उपासाइतकेच उपासनेलाही महत्त्व असते. आपली ईच्छा देवासमोर प्रगट करावी आणि ईच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. ईच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही, असे सांगितले जाते.

बहुला चतुर्थी व्रत अन् श्रीकृष्ण पूजन

या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भूत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सांगितले जात आहे. 

श्रावण संकष्ट चतुर्थीचे कसे कराल व्रत?

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.

श्रावण संकष्ट चतुर्थी: गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४

श्रावण वद्य चतुर्थी प्रारंभ: गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०१ वाजून ४६ मिनिटे.

श्रावण वद्य चतुर्थी समाप्ती: शुक्रवार, २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने २२ ऑगस्ट २०२४ रोजी व्रताचरण करावे, असे सांगितले जात आहे.

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
पुणेरात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
सातारारात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
नाशिकरात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे
धुळेरात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे
जळगावरात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे
बीडरात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
सांगलीरात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे
सोलापूररात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून ४१ मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)रात्रौ ०८ वाजून ५२ मिनिटे
भुसावळरात्रौ ०८ वाजता ५० मिनिटे
परभणीरात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून ४८ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
पणजीरात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे
बेळगावरात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे
इंदौररात्रौ ०८ वाजून ४८ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मासPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिकganpatiगणपती