Shravan Ravivar Aditya Ranubai Vrat 2025: चातुर्मासातील(Chaturmas 2025) महत्त्वाचा मानला गेलेला श्रावण(Shravan 2025) मास सुरू आहे. श्रावणातील व्रते, सण यांना केवळ धार्मिक, सांस्कृतिक महात्म्य आहे असे नाही, तर आरोग्य तसेच निसर्गाच्या दृष्टीनेही तितकेच महत्त्व आहे. हे सण साजरे करण्यामागे, तशाच पद्धतीने व्रताचरणामागे विशेष भूमिका आपल्या पूर्वजांची असलेली पाहायला मिळते. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पति पूजन, जिवतीची पूजा, नृसिंह अश्वत्थ मारुती पूजन झाल्यानंतर श्रावणातील पहिला रविवार येत आहे. या दिवशी आदित्य राणूबाई व्रत(Aditya Ranubai Vrat 2025) केले जाते. जाणून घेऊया...
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
या व्रतानंतर पुन्हा गतवैभव लाभले
राणूबाई ही सूर्याची पत्नी. तिची पूजा या व्रतात केली जाते. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली. तिला या गोष्टीचा खूप पश्चात्ताप झाला. यानंतर तिने आदित्य राणूबाईची पूजा केली. व्रताचा संकल्प करून आदित्य राणूबाईचे मनोभावे पूजन केले. या व्रतानंतर तिला पुन्हा गतवैभव लाभले. अशा आशयाच्या कथा आढळून येतात.
महाराष्ट्रात आदित्य राणूबाई व्रताची विशेष परंपरा
महाराष्ट्रातील खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगलकार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. त्यापैकी ही एक प्रथा म्हणावी लागेल. श्रावण महिना हा उपवासांचा, व्रत-वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. साहजिकच श्रावणी रविवार हा आदित्य-राणूबाईंच्या पूजेसाठी राखला गेला असावा. ज्यांना शक्य असेल, त्यांनी विधिवत हे व्रत करावे. शक्य नसेल, त्यांनी स्नानादी नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईंची मानसपूजा करून गायत्री मंत्रजप करावा, असे सांगितले जात आहे.
Shravan 2025: श्रावण सुरू झाला, पण उपासना काय करावी सुचेना? 'या'पैकी एक पर्याय निवडा!
आदित्य राणूबाई व्रत करणे शक्य नसेल तर...
आदित्य राणूबाई व्रत करणे शक्य नसल्यास श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारी नाही, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. मात्र, शास्त्रोक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते.
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!