शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

श्रावण जन्माष्टमी: यंदा गोकुळाष्टमी कधी आहे? पाहा, व्रताचरणाचे महत्त्व अन् काही मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 13:19 IST

Sawan Krishna Janmashtami 2023: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. यंदा कधी आहे गोकुळाष्टमी? जाणून घ्या, सविस्तर...

Sawan Krishna Janmashtami 2023: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥... श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात, ते गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचे.  श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. यंदाच्या वर्षी गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती वा जन्माष्टमी कधी आहे? जाणून घेऊया... (Shravan Shri Krishna Jayanti 2023 Date And Time)

बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्त्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते. (Shravan Gokulashtami 2023 Date And Time)

श्रावण वद्य अष्टमी प्रारंभ: बुधवार, ०६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०३ वाजून ३७ मिनिटे.

श्रावण वद्य अष्टमी सांगता: गुरुवार, ०७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०१ वाजून १६ मिनिटे.

श्रीकृष्ण जन्मोत्सव: बुधवार, ०६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्रौ १२ वाजता. (जयंती योग)

​देशभरातील जन्माष्टमी उत्सव

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात. मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ, वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वृंदावनात दोलोत्सव असतो. या दिवशी रासलीलांचे सादरीकरण केले जाते. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात. (Shravan Janmashtami 2023)

जन्माष्टमी व्रत आणि व्रताचरणाचे महत्त्व

जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.  तसेच जन्माष्टमीचे व्रत केल्याने अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते, अशी धारणा असल्याची लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. 

जन्माष्टमी व्रताची सांगता

जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. देशभरात प्रांताप्रमाणे व्रचारणाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपापल्या पद्धतींनुसार व्रताचरण करावे, असे सांगितले जाते.

 

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशल