शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

Shravan 2023: शिवोपासक बुटी महाराज यांनी यांच्या काळात बांधलेले हे प्राचीन शिवमंदिर त्यांच्याच नावे ओळखले जाते; वाचा इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 18:00 IST

Shiva Temple: भक्ताच्या नावाची ओळख भगवंताला मिळणे यासारखी दुसरी पुण्याई कोणती? हेच सद्भाग्य लाभले बुटी महाराजांना!

>> सर्वेश फडणवीस

भारतात शिव या देवतेचे असंख्य भक्त आहेत. किंबहुना इतर कोणत्याही देवतेपेक्षा शिव हा अधिक लोकप्रिय आहे. शिवपुराण, लिंगपुराण, अग्निपुराण यांतून याच्याबद्दल अधिक माहिती आढळते. शिवाच्या कितीतरी लीलांवर आधारित हजारो मूर्ती घडविल्या गेल्या. आपण ज्या शहरात राहतो त्याठिकाणी सुद्धा पावलापावलावर महादेव मंदिर हे जवळपास बघायला मिळतेच. नागपुरातील प्राचीन मंदिरांबद्दल जाणून घेताना आजही नवनवीन माहिती मिळते. भोसलेकाळीं बांधलेली ही मंदिरे काही प्रमाणात चांगल्या स्थितीत बघायला मिळतात. काही अजूनही चांगल्या स्थितीत नाही. असे असले तरी त्यांचा योग्य परिचय आणि प्रयोजन यासंबंधीची जाण अनेकांना व्हावी म्हणून या माध्यमातून अशा प्राचीन शिवालयाबद्दल दर श्रावण सोमवारी लिहिण्याचा प्रयत्न केला. 

देगलूरकर सर एके ठिकाणी लिहितात, शिवाचे आख्यान लावले तर लक्षात येते की, याच्या व्यक्तिमत्त्वात बराच विरोधाभास आहे. अमंगल आणि मंगल, तसेच, रौद्र आणि सौम्य, सर्व संहारक (महाकाल) आणि सुखनिधान (सदाशिव), भयंकर असा तो आहे. ब्रह्मा सृष्टिनिर्माता, विष्णू सृष्टिपोषक तर शिव संहार करणारा म्हणून सर्वज्ञात आहेत. शिव संहारक आहे तरी लगेच नवसर्जन घडवून आणणाराही आहे. म्हणजेच तो सर्जक नसला तरी सर्जनाचे बीज धारण करणारा आहे. म्हणूनच त्याला बीजी म्हटले आहे. शिवाची उपासना करणारा समाज, विष्णू आणि इतर देवतांच्या उपासकांपेक्षा, संख्येने खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे वैदिकात त्याचा समावेश बऱ्याच उशिराचा आहे, प्रारंभी तर तोही विरोधाला तोंड देतच आला आहे. त्याची अनेक रूपे आहेत, अनेक नावे आहेत, तसेच त्याच्या परिवारात कोणाची गणना होते, त्याचे कार्यकर्तृत्त्व काय इत्यादी बाबींचा परिचय त्याच्या नावातूनच होतो. 

भारतात लिंगपूजेचे अस्तित्व फार प्राचीन काळापासूनचे आहे. आणि विशेष म्हणजे ते आजतागायत चालू आहे. इतर कोणत्याही देवतापूजेपेक्षा ते अधिक प्रमाणात लोकप्रिय आहे. विविध प्रकारच्या शिवलिंगांचा विग्रह आपल्याला अनेक शिवालयात गेल्यावर सहज नजरेत भरतो. असेच एक प्राचीन शिवालय नागपूर शहराच्या मध्यभागी सीताबर्डी भागात बघायला मिळतो. हेच ते धर्ममूर्ती ताराबाई बुटी महादेव मंदिर. 

श्री बुटींचे शिवमंदिर किंवा बुटी महादेव मंदिर या नावाने हे शिवालय ओळखल्या जाते. आज शहराच्या मध्यभागी असलेले महादेव मंदिर आता जीर्ण झाले आहे. याबद्दल अशी माहिती सांगितली जाते की भोसल्यांच्या दरबारी असलेले पू. रामचंद्र बुटी महाराज हे शिवोपासक होते आणि कालांतराने साधनेकरीता गिरनार क्षेत्री निघुन गेले. यांच्याच काळात मंदिराची स्थापना झाली. पुढे धर्ममूर्ती ताराबाई बुटी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिरातील सभामंडप आणि शिवलिंग आजही बघायला मिळतो. निवृत्ती-ज्ञानराजांपासून चालत आलेल्या नाथ परंपरेतील पू. रामचंद्र म. महाराज बुटी यांची समाधी पण याच परिसरात (मागच्या बाजुला) आहे. हा सर्व परिसर अर्थात ही वास्तु बुटी वंशजाकडे आहे, त्यामुळे त्यांच्या परवानगीने आपण ही संपूर्ण वास्तू बघू शकतो. नागपुरातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. दादाबुवा देवरस यांनी या मंदिरात त्यांचे गुरू थोरलेस्वामी वासुदेवानंदसरस्वती टेम्बे स्वामी महाराज यांचा समाराधना दिन उत्सव याच बुटी मंदिरात सुरू केला आणि गेली अनेक वर्षे झाली आजही हा उत्सव नियमित सुरू आहे. आज या उत्सवाच्या निमित्ताने या मंदिरात भाविकांची वर्दळ असते. आवर्जून एकदा तरी दर्शनासाठी जावे असेच हे बुटी महादेव मंदिर आहे. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलTempleमंदिरnagpurनागपूर