शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Durva Ashtami Vrat: दुसरा श्रावणी शुक्रवार: दुर्गाष्टमीला करा दूर्वाष्टमी व्रत; जाणून घ्या, महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 18:33 IST

Shravan Durva Ashtami Vrat: गणेश पूजनात अतिशय महत्त्व असलेल्या दूर्वांशी निगडीत हे व्रत असून, या व्रताचरणाने गणपती बाप्पासह महादेव आणि देवीचे शुभाशिर्वाद मिळू शकतात. जाणून घ्या...

श्रावणाला व्रत-वैकल्यांचा आणि उत्सवांचा महिना मानले गेले आहे. ऋतुचक्रात श्रावण महिन्याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच ते आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्याही प्राप्त झाले आहे. श्रावणातील व्रत-वैकल्ये आणि परंपरा या निसर्ग, आरोग्य आणि व्यवहारिकतेला धरून आहेत. श्रावणातील प्रत्येक दिवसाला जसे विशिष्ट महत्त्व आहे, तसेच या महिन्यात येणाऱ्या सणांना, व्रतांनाही आहे. श्रावणानंतर येणाऱ्या भाद्रपदात गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. गणपतीला दूर्वा या प्राधान्याने वाहिल्या जातात. याच दूर्वांचे श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमीला पूजन केले जाते. याला दूर्वाष्टमी व्रत असे म्हटले जाते. अनेक भागात दूर्वाष्टमीचे व्रत भाद्रपद शुक्ल अष्टमीला केले जाते. यंदाच्या वर्षी ०४ ऑगस्ट २०२२ रोजी श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी दुर्गाष्टमीला दूर्वाष्टमी आहे. श्रावणातील दूर्वाष्टमीचे व्रत, महत्त्व, मान्यता आणि कथा यांविषयी जाणून घेऊया... (Shravan Durva Ashtami Vrat 2022)

दूर्वाष्टमीचे व्रत करण्यापूर्वी श्रावण शुद्ध सप्तमीला उपवास केला जातो. अष्टमीला संकल्पपूर्वक ज्या स्वच्छ, पवित्र अशा जमिनीवर दूर्वा उगवलेल्या असतील, त्या ठिकाणी जाऊन दूर्वांवरच शिवलिंग ठेवून त्या दूर्वांची आणि शिवलिंगाची पूजा करावी. शिवपूजेत दूर्वा-रशमी तसेच अन्य फुले असणे आवश्यक आहे. शेवटी खोबरे, खजूर यांचा नैवेद्य दाखवावा. अक्षता घातलेल्या दह्याचे अर्घ्य द्यावे. स्वत: व्रतकर्त्या महिलांनी त्या दिवशी केवळ फलाहार घ्यावा. उद्यापनाच्यावेळी पूजा-हवन करावे. तीळ आणि कणीक असलेले पदार्थ भोजनात असणे आवश्यक असते. असे भोजन आमंत्रित केलेल्या उपस्थित सर्व कुटुंबातील सदस्य, आप्तेष्टमंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना द्यावे. (Shravan Durva Ashtami Vrat Puja Vidhi In Marathi)

व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती यांची पूजा करावी

श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमी या दिवशी करावयाचे दूर्वांशी संबंधित असे हे दूर्वाष्टमी व्रत आहे. या व्रतामध्ये दूर्वांना विशेष महत्त्व दिलेले आहे. व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती यांची पूजा करावी. पंचामृताचा अभिषेक करावा. मुख्य अभिषेक झाल्यानंतर ऋतुकालोद्भव फुले, फळे वाहावीत. धूप, दीप व नैवेद्य दाखवावा. आरती करावी. पूजेच्या शेवटी 'त्वं दूर्वेS मृतनामासि पूजितासि सुरासुरै : । सौभाग्यसनतिं दत्वा सर्वकार्यकारी भव ।। यथा शाखाप्रशाखाभिर्विस्तुतासि महीतले । तथा ममापि सन्तानं देहि त्वमजरामरम् ।।' हा श्लोक म्हणावा. (Shravan Durva Ashtami Vrat Significance)

करा दुर्वांची प्रार्थना

दूर्वांसह शिव, पार्वती आणि गणपतीची केलेली पूजा आटोपल्यावर दूर्वांची प्रार्थना करावी. मला संपत्ती, सौभाग्य, संतती देऊन सर्वकार्य सिद्धीस जाण्यास सहाय्यकारी हो. असंख्य शाखांनी समृद्ध होऊन तू जशी बहरून पृथ्वीवर सर्वदूर पसरतेस, तशीच सर्वदूर कीर्ती पसरविणारी संतती मला दे. माझी वंशवेलही तुझ्याचसारखी बहरत जावो, अशा अर्थाची साध्या, सोप्या भाषेत प्रार्थना करावी. पूजा आणि प्रार्थना झाल्यावर दूर्वाविषयक कथा ऐकावी. कोणत्याही पूजनाच्या शेवटी त्यासंदर्भातल कथा श्रवण करणे, वाचणे लाभदायक मानले गेले आहे. (Shravan Durva Ashtami Vrat Katha)

दूर्वाष्टमी व्रतकथा 

दूर्वांसह शिव, पार्वती आणि गणपतीची केलेली पूजा आटोपल्यावर दूर्वांची प्रार्थना करावी. मला संपत्ती, सौभाग्य, संतती देऊन सर्वकार्य सिद्धीस जाण्यास सहाय्यकारी हो. असंख्य शाखांनी समृद्ध होऊन तू जशी बहरून पृथ्वीवर सर्वदूर पसरतेस, तशीच सर्वदूर कीर्ती पसरविणारी संतती मला दे. माझी वंशवेलही तुझ्याचसारखी बहरत जावो, अशा अर्थाची साध्या, सोप्या भाषेत प्रार्थना करावी. पूजा आणि प्रार्थना झाल्यावर दूर्वाविषयक कथा ऐकावी. कोणत्याही पूजनाच्या शेवटी त्यासंदर्भातल कथा श्रवण करणे, वाचणे लाभदायक मानले गेले आहे.

दुर्वांना लाभले अमरत्वाचे वरदान

समुद्र मंथनातून अमृताने भरलेला कुंभ दूर्वांच्या आसनावर ठेवल्यानंतर त्या कलशातील अमृताचे काही थेंब दूर्वांवर सांडले. त्यामुळे अमरत्वाचा गुण दूर्वांमध्ये आला, अशी कथा पुराणांमध्ये आढळते. त्यामुळे श्रावण शुद्ध अष्टमीला या दूर्वांची पूजा केली जाते. संतती, सौभाग्य, संपत्तीचा लाभ मिळण्यासाठी हे व्रत करावे, असे सांगितले जाते. दूर्वांची पूजा करताना कोणाचाही पाय न पडलेल्या शुद्ध आणि स्वच्छ दूर्वाच घ्याव्यात, असे आग्रहाने सांगितले जाते. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलspiritualअध्यात्मिक