शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

Shiv Jayanti 2025: पुण्यात शनिपाराजवळ आहे अष्टभुजा देवीसमवेत शिवरायांचे सुंदर मंदिर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 10:25 IST

Shiv Jayanti 2025 Celebration: आज तिथीने शिवजयंती, सणाच्या दिवशी आपण देवदर्शन घेतो, तसे शिवजयंतीनिमित्त या सुंदर मंदिराला भेट द्यायलाच हवी!

>> मकरंद करंदीकर.

हिंदू तिथीप्रमाणे १७ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आत्तापर्यंत आपण महाराजांची जयंती हिंदू तिथीप्रमाणेच साजरी करत होतो आता ती तारखेनुसारही साजरी होऊ लागली आहे. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व लक्षात घेता असा सोहळा नऊ दिवस, दहा दिवस साजरा केला तरी कमीच आहे. पण शिवजयंतीचा दिवस, दोन वेळा साजरा करण्यामुळे एक चुकीचा संदेश पोहोचू शकतो. शिवाजी महाराजांनी कुठल्याही सत्तेसमोर न नमता त्यांना आव्हान देऊन, अनेक युद्धे आणि चढाया जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. खुद्द जे इंग्रज नजराणे घेऊन महाराजांपुढे  नतमस्तक झाले, त्या इंग्रजांच्या कॅलेंडरनुसार शिवजयंती साजरी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पडतो ! ज्यांच्या काळामध्ये इंग्रजी  कॅलेंडरच मानले जात नव्हते, ज्या राजांनी स्वतःच्या नावाचा शक सुरू केला त्या शककर्त्या राजाची जयंती परक्या राज्यकर्त्यांच्या कॅलेंडरनुसार साजरी करण्याचे प्रयोजनच काय ? छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची महती आपण आत्ताच पाहिली. हिंदू धर्माप्रती या पितापुत्रांची बांधिलकी सर्वांनाच माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या मूर्तीला,  जयंतीनिमित्त हिंदू पद्धतीने पंचामृताचा अभिषेक केला जातो, पालखीतून नेण्याचा सन्मान केला जातो. त्यांची जयंती मात्र इंग्रजी तारखेनुसार? असो! 

आज तिथीनुसार शिवजयंती! आनंदाची गोष्ट म्हणजे आता तर छत्रपती शिवाजी महाराजांची ठिकठिकाणी मंदिरेही होऊ लागली आहेत.

पुण्यामध्ये शनिपारावर पूर्वापार असलेल्या शनि आणि मारुतीच्या मंदिराच्या मागच्याच बाजूला, अष्टभुजा भवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत आहे, अशा धातूच्या भित्तीमूर्तीचे ( म्युरल ) एक अगदी छोटेसे मंदिर पाहायला मिळते. आपण गणेशापुढे मूषक, विष्णुपुढे गरुड, रामापुढे मारुती, शंकरापुढे नंदी अशी वाहने नेहमी पाहतो. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे भवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांनाही शोभून दिसेल असे सिंह वाहन या मूर्तीपुढे पाहताना खूप आनंद होतो.

आज संकष्टी आणि तिथिनुसार शिवजयंती; त्यानिमित्त पाहू शिवाजी महाराजांचे कसबा गणपतीशी नाते!

प्रत्येक शिवभक्ताने हे मंदिर बघायलाच हवे. पुण्यात गेल्यावर या मंदिराला आवर्जून भेट द्या. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवराय महाजयंती निमित्त, महाराजांना त्रिवार वंदन !

ई-मेल : makarandsk@gmail.com

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPuneपुणेTempleमंदिरShivjayantiशिवजयंती