शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
4
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
5
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
6
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
7
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
8
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
11
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
12
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

Shattila Ekadashi 2024: षटतिला एकादशीला उपास शक्य नाही? निदान 'हे' पदार्थ खाणे टाळा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 10:58 AM

Shattila Ekadashi 2024: ६ फेब्रुवारी रोजी षटतिला एकादशी आहे, विष्णुकृपेच्या प्राप्तीसाठी या दिवशी आहाराचे दिलेले नियम अवश्य पाळा!

६फेब्रुवारी रोजी पौष मासातील षटतिला एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी दोन वेळेचा उपास करतात आणि द्वादशीला उपास सोडतात हे आपल्याला माहीत आहेच. परंतु काही कारणाने हा उपास करता आला नसेल, तर वाईट वाटून घेऊ नका परंतु पुढील चुका अवश्य टाळा!

षटतिला एकादशीचे महत्त्व :

पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते. त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल, हे बघितले आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षटतिला एकादशी! मकरसंक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मासाला लाभला आहे, तो वेगळाच! निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आरोग्यासाठी म्हणून हे व्रत जरूर करावे.

षटतिला एकादशीनिमित्त हवन विधी : 

तसेच या व्रताला तिलधीव्रत असेही म्हटले जाते. यानुसार षटतिला एकादशीला तीळ मिश्रित गोवऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते. परंतु आताच्या काळात शहरात गाईचे शेण मिळणे दुरापास्त आहे. तसेच त्याच्या गोवऱ्या स्वत: करणे देखील कोणी पसंत करणार नाही. त्याऐवजी पूजा हवन साहित्याच्या दुकानातून तयार शेण्या आणून त्याच्या बरोबर तीळ गेऊन दोन्हीचे एकत्रित हवन करणे सोपे होईल. अर्थात हवनही माफक प्रमाणात करणे उचित होईल. अन्यथा शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. थंडीच्या दिवसात सर्दी खोकला तसेच अनेक आजार होत राहतात. हवनाच्या निमित्ताने गोवऱ्यांचा वापर केल्याने वातावरणशुद्धी होते. घर प्रसन्न वाटते. असा अध्यात्मिक आणि शास्त्रीय हेतू पाहता षटतिला एकादशीचे व्रत आपल्यालाही सहज अनुसरता येईल. 

महत्त्वपूर्ण नियम 

>> या दिवशी तिळाचे दान केले असता ते थेट भगवान विष्णूंना मिळते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आज तुम्ही हळदीकुंकू समारंभ करत असाल तर तिळाचे दान करायला विसरू नका. 

>> एकादशीचा उपास आपल्या प्रकृतीसाठी अतिशय लाभदायक असतो. परंतु काही कारणाने उपास मोडला असेल किंवा करता आला नसेल तर निदान आजच्या दिवशी मांसाहार करू नका. जेवणात भाताचा समावेश करू नका. 

>> एकादशीचे व्रत अध्यात्मिक उन्नतीसाठी केले जाते. व्रतस्थ जीवन जगण्याची ती शिकवण असते. तिचे अनुसरण करण्यासाठी आजच्या दिवशी तामसी भोजन टाळा. ब्रह्मचर्य पाळा. आपले दैनंदिन काम पूर्ण करून भक्तिभावे विष्णूंचे स्मरण करा. 

>> अन्य स्तोत्र पाठ नसली तरी 'ओम विष्णवे नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप अवश्य करा. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३foodअन्न