शनीचे संक्रमण खूप महत्वाचे आहे. ज्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा होते, त्याचे भाग्य उजळते. शनी न्यायाचा देव मानला जातो. तो अतिशय शिस्तप्रिय आहे. कोण कसे वागते यावर त्याची बारीक नजर असते. त्यांनी कोणाची परीक्षा घ्यायची ठरवली तर ती व्यक्ती सुतासारखी सरळ होते. २९ एप्रिल रोजी शनीने ३० वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश केला आहे. मात्र, मकर राशीतून अडीच वर्षांनी कुंभ राशीत गेलेला शनी केवळ ७५ दिवस कुंभमध्ये मुक्काम करून परत स्थलांतर करणार आहे. हे स्थलांतर कुठून कोणत्या दिशेने व कधी होणार आहे ते जाणून घेऊ.यावेळी शनि प्रतिगामी असेल१२ जुलै नंतर, शनि मागे जाईल आणि पुन्हा स्वतःच्या राशीत मकर राशीत प्रवेश करेल. यासोबतच त्यांचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ प्रभाव राहील. १२ जुलैपर्यंत अर्थात पुढचे अडीच महिने तो तीन राशींसाठी लाभदायक ठरेल.या राशींवर शनिची कृपा राहीलमेष : कुंभ राशीतील शनीचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी चांगले ठरेल. शनिदेवाच्या कृपेने त्यांना चांगले पैसे मिळतील. नोकरी किंवा व्यवसायात चांगले यश मिळेल. पैशासाठी नवीन मार्ग मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. गुंतवणूकित यश मिळेल. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या शारीरिक व्याधींमधून मुक्ती मिळेल.
Shani Gochar 2022 : पुढील अडीच महिने शनी कृपेने 'या' तीन राशींना मिळेल अमाप पैसा आणि चमकेल भाग्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 12:13 IST