शनि दर्शनाला शनिशिंगणापूरला जाताय? देवस्थानने घेतला मोठा निर्णय, १ मार्चपासून बदल लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 13:07 IST2025-02-15T13:07:17+5:302025-02-15T13:07:31+5:30

Shani Shingnapur Devasthan Big Decision: शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यासाने नेमका कोणता निर्णय घेतला आहे? शनिशिंगणापूरला जाताना भाविकांनी कोणती गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हवी? जाणून घ्या...

shanaishchara devasthana take big decision about worship shani dev in shani shingnapur and rule change implement from 1 march 2025 | शनि दर्शनाला शनिशिंगणापूरला जाताय? देवस्थानने घेतला मोठा निर्णय, १ मार्चपासून बदल लागू

शनि दर्शनाला शनिशिंगणापूरला जाताय? देवस्थानने घेतला मोठा निर्णय, १ मार्चपासून बदल लागू

Shani Shingnapur Devasthan Big Decision: महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनि शिंगणापूर हे देवस्थान आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी नाव जोडले गेले. हे एक तीर्थक्षेत्र मानले जात असून तिथे शनीदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. या ठिकाणी लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. परंतु, या मंदिराच्या समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा बदल १ मार्चपासून लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नेमके काय बदल होणार? जाणून घेऊया...

शनी देवाची शिळा एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. एका व्यापाऱ्याला नवस पूर्तीचा अनुभव आला त्यामुळे त्याने शिळेभोवती चौथरा बांधला, असे सांगितले जाते. या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका प्रचिलित आहेत. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज होत आहे. शनि देवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास आणि ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला.  

शनैश्वर देवस्थान मंडळाने कोणता निर्णय घेतला आहे?

शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र, तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचे सांगितले जात आहे. शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला. हा बदल १ मार्च २०२५ पासून लागू करण्यात येत आहे. त्यामुळे १ मार्चपासून शनिदेवाला सुट्या तेलाऐवजी भाविकांना ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागणार आहे. भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.

दरम्यान, शनि शिंगणापूर हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते. शनि कृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तैलाभिषेक करण्यासाठी येतात. शनिशिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य तेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Web Title: shanaishchara devasthana take big decision about worship shani dev in shani shingnapur and rule change implement from 1 march 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.