Shakambhari Purnima 2024: पौर्णिमेला चंद्र दर्शन घेतल्याने होणारे असंख्य फायदे वाचून थक्क व्हाल! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 11:51 AM2024-01-25T11:51:53+5:302024-01-25T11:52:18+5:30

Shakambhari Purnima 2024: आज शाकंभरी पौर्णिमा, आपल्या आयुष्यात त्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शीतलता अनुभवायची असेल त्यांनी चंद्र दर्शन चुकवू नका!

Shakambhari Purnima 2024: You'll be Amazed to Read the Numerous Benefits of Moon Darshan on Purnima! | Shakambhari Purnima 2024: पौर्णिमेला चंद्र दर्शन घेतल्याने होणारे असंख्य फायदे वाचून थक्क व्हाल! 

Shakambhari Purnima 2024: पौर्णिमेला चंद्र दर्शन घेतल्याने होणारे असंख्य फायदे वाचून थक्क व्हाल! 

सूर्य जितका तापदायक, चंद्र तेवढाच शीतल, शांत. तरी दोघांचे महत्त्व आपापल्या जागी मोठंच आहे. तरी देखील पृथ्वीवरून दिसणारे हे दोन देव त्यांची पूजा अर्चा आपल्या संस्कृतीने सांगितली आहे. वाचा चंद्र दर्शनाचे अधिक फायदे... 

चंद्राजवळ सुंदरता व शीतलता यांचा समन्वय पहायला मिळतो. केवळ बाह्य सौंदर्य कित्येक वेळा मोहक, मादक व दाहकही बनते. परंतु त्यात जेव्हा आंतर सौंदर्य मिसळते त्यावेळी ते शीतल व शांतिदायक बनते. संतांजवळ चंद्राच्या शीतल चांदण्यासारखे सौंदर्य असते. आपल्या अगदी जवळचे अवतार राम व कृष्ण. यांच्याजवळही शांत व प्रसन्न सौंदर्य होते. म्हणूनच लोक त्यांना रामचंद्र, कृष्णचंद्र म्हणू लागले, असे सुंदर विवेचन प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले करतात.

गीतेत भगवंताने `नक्षत्राणामहं शशी' असे म्हणून चंद्राला स्वत:ची विभूती मानले आहे. सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण आहे पण चंद्रासमोर तासनतास मांडी घालून बसू शकतो. चंद्र हा मनाचा देव आहे. संतप्त मनाचा माणूस पौर्णिमेच्या चांदण्यात फिरायला निघाला तर त्याला मानसिक शांततेचा अनुभव येतो. 

चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शीतल आहे एवढेच नाही, तर तो उपयोगी व उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. भगवान गीतेत सांगतात, `रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो. पुष्णामि चौषधी: सर्वा: सोमो भूत्वा रसात्मक:!'

चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ. समुद्र मंथनात तो तिच्या पाठोपाठ आला. त्याची आणि लक्ष्मी मातेची जन्मतिथी एकच, ती म्हणजे पौर्णिमा. त्यामुळे या तिथीवर दोघांचे पूजन करून त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि चंद्राचे शीतल चांदणे पडलेले दूध नैवेद्य म्हणून प्राशन केले जाते. म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अडचणीतून सोडवणारे हे चंद्र दर्शन लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद मिळवून देते. म्हणून सध्या थंडीचा जोर वाढत असला तरी चंद्राची शीतलता तनामनाला आल्हाद दायी ठरते म्हणून  त्याचे दर्शन घेण्याची संधी अजिबात सोडू नका. 

Web Title: Shakambhari Purnima 2024: You'll be Amazed to Read the Numerous Benefits of Moon Darshan on Purnima!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.