शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Sarva Pitru Amavasya 2023: शनिवार आणि सर्वपित्री अमावस्या या योगावर आवर्जून करा 'हे' स्तोत्र पठण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 07:00 IST

Sarva Pitru Amavasya 2023: पितृपक्षाचा शेवटचा दिवस सर्वपित्रीचा, योगायोगाने तो शनिवारी आला आहे, पितरांचा आणि शनी देवाचा आशीर्वाद मिळवण्याची संधी दवडू नका!

शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. पितृपक्षात दानधर्माचे महत्त्व असतेच, शिवाय एरवीसुद्धा दानधर्म करणारी मंडळी शनी देवाच्या कृपेस पात्र ठरतात. यासाठी दानधर्माबरोबर पुढील शनी स्तोत्राची जोड द्या आणि कुंडलीतील शनी पीडेपासून मुक्ती मिळवा. 

नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च।नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम:।

नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च।नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते। 

नम: पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नम:।नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते। 

नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्ष्याय वै नम:।नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने। 

नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तु ते।सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करेऽभयदाय च। 

अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते।नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तुते। 

तपसा दग्ध-देहाय नित्यं योगरताय च।नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नम:। 

ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज-सूनवे।तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात्। 

देवासुरमनुष्याश्च सिद्ध-विद्याधरोरगा:।त्वया विलोकिता: सर्वे नाशं यान्ति समूलत:। 

प्रसाद कुरु मे सौरे ! वारदो भव भास्करे।एवं स्तुतस्तदा सौरिर्ग्रहराजो महाबल:।

स्तोत्राचा अर्थ : 

ज्यांच्या शरीराचा रंग कृष्ण आणि भगवान शंकरासारखा निळा आहे, अशा शनिदेवांना माझा नमस्कार. या जगासाठी कालाग्नी आणि क्रान्ताच्या रूपात आलेल्या शनिश्चराला नमस्कार. ज्याचे शरीर सांगाड्यासारखे मांसहीन आहे आणि ज्यांचे दाढी-मिशा आणि केस वाढलेले आहेत, त्या शनिदेवाला वंदन आहे, ज्याचे डोळे मोठे आहेत, पाठीला चिकटलेले पोट आहे आणि भयानक आकार आहे.

ज्यांचे शरीर लांब रुंद आहे, ज्यांचे केस खूप जाड आहेत, ज्यांचे शरीर जर्जर आहे आणि ज्यांची दाढ काळी आहे, अशा शनिदेवांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला जातो. हे शनिदेव! तुझे डोळे खोल भेदक आहेत, तुझ्याकडे पाहणे कठीण आहे, तू उग्र, उग्र आणि भयंकर आहेस, तुला नमस्कार. सूर्यनंदन, भास्कर-पुत्र, निर्भयपणा देणारी देवता, वालिमुख, सर्व काही तूच, शनिदेवाला नमस्कार असो.

तुझी दृष्टी अधोमुखी आहे, सावकाश चालणार्‍या आणि तलवारीप्रमाणे ज्यांचे प्रतीक आहे अशा शनिदेवाला वारंवार नमस्कार करतो. तू तपश्चर्येने तुझे शरीर जाळले आहेस, तू योगाभ्यास करण्यास सदैव तत्पर आहेस, भुकेने व्याकूळ आहेस आणि अतृप्त आहेस. तुला सदैव नमस्कार. कश्यपानंदन, सूर्यपुत्र शनिदेवा नमस्कार. 

जेव्हा तुम्ही संतुष्ट असता तेव्हा तुम्ही सुख देता आणि जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुम्ही ते लगेच काढून घेता. व्यक्तीची वागणूक योग्य अयोग्य ठरवून मगच प्रसन्न होता. अशा शनिदेवाला नमस्कार असो. तू माझ्यावर प्रसन्न हो. मी वरदान मिळण्यास पात्र आहे आणि तुझ्या आश्रयाला आलो आहे.

शनी स्तोत्राचे पठण केल्याने होणारा लाभ :

अशा या स्तोत्राचे पठण जो करेल, मग तो मनुष्य असो, देव असो वा राक्षस, सिद्ध आणि विद्वान असो, त्याला शनिदेवामुळे कोणताही अडथळा येणार नाही. ज्यांच्या महादशा किंवा अंतरदशा, संक्रमण किंवा आरोही, द्वितीय, चतुर्थ, आठव्या किंवा बाराव्या स्थानात शनि असेल त्यांनी शुद्ध होऊन या स्तोत्राचा सकाळी, मध्यान्ह आणि संध्याकाळी तीन वेळा पठण केल्यास त्यांना शनीची कृपादृष्टी प्राप्त होईल. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष