शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Sankashti Chaturthi 2024: आर्थिक अडचणीतून सुटका आणि कर्जमुक्तीसाठी संकष्टीला सुरु करा 'हा' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 08:18 IST

Sankashti Chaturthi 2024: रोज अकरा वेळा दिलेला उपाय केला असता लवकरात लवकर कर्जमुक्ती होण्यास मदत होते, असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. 

आज श्रावण (Shravan 2024) संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024)आहे, ती हेरंब संकष्ट चतुर्थी या नावानेही ओळखली जाते. या तिथीला आपण भक्तिभावे उपास आणि उपासना करतो. बाप्पाने आपल्या हाकेला धावून यावे आणि प्रापंचिक अडचणीतून आपल्याला सोडवावे असे कोणाही भक्ताला वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी उपासनेचे बळ वापरायला हवे. नुसती इच्छा असून भागत नाही, पदरात पुण्यसंचयही असला पाहिजे हा पुण्यसंचय कसा होतो? तर सत्कर्म, भक्तिभाव आणि उपासनेच्या त्रिवेणी संगमाने!  गणपती हा जसा बुद्धिदाता आहे तसाच तो सिद्धीदातादेखील आहे. आर्थिक अडचणी सोडवून करिअरमधील प्रगतीसाठी करा दिलेला उपाय!

हे ही वाचा : Sankashti Chaturthi 2024: संकष्टीला राशीनुसार करा दान; मार्गी लागेल अडलेले काम!

संसार म्हटला की अडचणी येणार, त्यातही त्या आर्थिक स्वरूपाच्या असतील तर सगळे काही अवघड होऊन बसते. ऋण काढून सण साजरे करता येत नाहीत आणि पैशांचे सोंगदेखील आणता येत नाही. गाठीशी पैसा नसेल तर कोणी किंमतही देत नाही. अशा कात्रीत आपण सापडू नये, यासाठी ज्योतिष शास्त्राने 'ऋणमुक्ती स्तोत्रा'चे पठण करा असे सुचवले आहे. मात्र हे स्तोत्र एक दिवस म्हणून उपयोगाचे नाही, तर संकष्टीच्या मुहूर्तावर या स्तोत्र पठणाची सुरुवात करावी आणि रोज एक वेळ ठरवून न चुकता अकरा वेळा हे स्तोत्र म्हणावे. अनन्यभावे गणेशाला शरण जावे आणि आर्थिक अडचणी दूर होउदे आणि कर्जमुक्ती होउदे अशी विनंती करावी. नित्य सरावासाठी ऋणमुक्ती स्तोत्र पुढील प्रमाणे -

हे ही वाचा : Sankashti Chaturthi 2024: संकष्टीच्या मुहूर्तावर त्रिग्रही योगाचा शुभ संयोग; ५ राशींवर बापाच्या कृपेचा वर्षाव!

अस्य श्रीऋणविमोचनमहागणपतिस्तोत्रमन्त्रस्य शुक्राचार्य ऋषि:, ऋणविमोचन महागणपतिर्देवता, अनुष्टुप छन्द:, ऋणविमोचनमहागणपतिप्रीत्यर्थे जपे विनियोग:।

ऊँ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलम । षडक्षरं कृपासिन्धुं नमामि ऋणमुक्तये ।।1।।महागणपतिं वन्दे महासेतुं महाबलम । एकमेवाद्वितीयं तु नमामि ऋणमुक्तये ।।2।।एकाक्षरं त्वेकदन्तमेकं ब्रह्म सनातनम । महाविघ्नहरं देवं नमामि ऋणमुक्तये ।।3।।शुक्लाम्बरं शुक्लवर्णं शुक्लगंधानुलेपनम । सर्वशुक्लमयं देवं नमामि ऋणमुक्तये ।।4।।रक्ताम्बरं रक्तवर्णं रक्तगंधानुलेपनम । रक्तपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।5।।कृष्णाम्बरं कृष्णवर्णं कृष्णगंधानुलेपनम । कृष्णयज्ञोपवीतं च नमामि ऋणमुक्तये ।।6।।पीताम्बरं पीतवर्णं पीतगंधानुलेपनम । पीतपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।7।सर्वात्मकं सर्ववर्णं सर्वगन्धानुलेपनम । सर्वपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।8।।एतदृणहरं स्तोत्रं त्रिसन्ध्यं य: पठेन्नर: । षण्मासाभ्यन्तरे तस्य ऋणच्छेदो न संशय: ।।9।।सहस्त्रदशकं कृत्वा ऋणमुक्तो धनी भवेत ।।10।।

टीप : - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीShravan Specialश्रावण स्पेशलAstrologyफलज्योतिषchaturmasचातुर्मास