Ritual: जेवणाआधी फक्त 'हा' श्लोक म्हणा; आरोग्य, श्रीमंती आणि समाधानी आयुष्य मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:54 IST2025-02-07T12:53:19+5:302025-02-07T12:54:39+5:30
Ritual: जेवणाआधी दिलेला श्लोक म्हटला, तर कधीही अन्न बाधणार नाही, दारिद्रय येणार नाही आणि दुःख शिवणार नाही...

Ritual: जेवणाआधी फक्त 'हा' श्लोक म्हणा; आरोग्य, श्रीमंती आणि समाधानी आयुष्य मिळवा!
श्लोक, स्तोत्र, मंत्र यात प्रचंड ताकद असते. त्यातही सामूहिक प्रार्थना असेल तर ती लवकर सिद्धीस जाते. म्हणून पूर्वी पंगतीमध्ये लोक सामूहिक प्रार्थना करून 'हर हर महादेव' म्हणत जेवायला सुरुवात करायचे आणि एक श्लोक आवर्जून म्हणायचे, जो म्हटल्याने दुःख, दारिद्र आणि आजार आपल्याला शिवणारही नाहीत हा विश्वास असे आणि तो सार्थ ठरत असे. तो श्लोक जाणून घेण्याआधी आपला नेहमीचा श्लोकही समजून घेऊया.
हात पाय धुवून, मांडी घालून जेवायला बसावे आणि ताटाचा नैवेद्य दाखवून अर्थात ताटाभोवती पाणी फिरवून, ईश्वराचे स्मरण करावे, ही आपली संस्कृती आहे आणि संस्कारदेखील आहे. म्हणून बालपणी शाळेत डबा खाण्याआधी आपण सामूहिक प्रार्थना करायचो,
वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे,
सहज हवन होते, नाम घेता फुकाचे,
जीवन करी जिवित्त्वा, अन्न हे पूर्णब्रह्म,
उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म।
'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे.' पोट भरणे, हा जेवणाचा हेतू नाही, तर शरीर कार्यन्वित ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा अन्नातून कमावणे, हा या श्लोकाचा आशय आहे.'
जर तुम्हाला आरोग्य, श्रीमंती आणि समाधानी आयुष्य हवे असेल तर तुम्हीदेखील पुढील श्लोक म्हणा. त्यासाठी हातात पाणी घ्या आणि ताटाभोवती फिरवा आणि हात जोडून पुढील प्रार्थना करा-
अन्नं ब्रह्मा रसं विष्णुर्भोक्ता देवो महेश्वरः
एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यते
अन्नं ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम्
एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यते
हा श्लोक मनोभावे म्हटला असता त्याचे निश्चितच फळ मिळते असे म्हटले आहे. तुम्हीही हा प्रयोग अवश्य करून बघा आणि ईश्वराचे मनोभावे स्मरण करा.