शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

Ratha Saptami 2026 Wishes: रथसप्तमीच्या शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status, Images शेअर करत साजरा करा हा सण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:07 IST

Ratha Saptami 2026 Wishes: रथसप्तमी हा आरोग्य, यश, तेज, दीर्घायुष्य देणारा सण, त्यादिवशी आपल्या प्रिय मित्र मैत्रिणींना मराठीतून द्या 'या' प्रेमळ शुभेच्छा!

माघ शुद्ध सप्तमीला सूर्यदेवाने आपल्या दिव्य रथात बसून सृष्टीला प्रकाशमान करण्यास सुरुवात केली, म्हणूनच हा दिवस आपण 'रथसप्तमी' किंवा 'सूर्यजयंती' म्हणून साजरा करतो. हिंदू धर्मात सूर्याला 'आरोग्यकारक' मानले जाते. "आरोग्यं भास्करादिच्छेत्" या उक्तीनुसार, सुदृढ शरीरासाठी आणि तेजस्वी बुद्धीसाठी या दिवशी केलेली सूर्योपासना अत्यंत फलदायी ठरते.

Ratha Saptami 2026: रथसप्तमीला कशी करावी सूर्यपूजा? जाणून घ्या सूर्यउपासनेचे फायदे आणि अध्यात्मिक महत्त्व 

थंडीचे दिवस सरून उबदार वसंताची चाहूल देणारा हा काळ निसर्गातही सकारात्मक बदल घडवून आणतो. या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे, सूर्यनमस्कार घालणे आणि रुईच्या पानांनी स्नान करणे यामागे केवळ धार्मिकच नव्हे, तर मोठे शास्त्रीय कारण दडलेले आहे. सूर्याचे तेज आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच या दिनाची खरी भावना आहे. यंदा २५ जानेवारी रोजी रथसप्तमी(Ratha Sapatmi 2026) आहे. या सणाच्या मराठीतून आरोग्यदायी शुभेच्छा देऊया. 

"सूर्यदेवाची दिव्य प्रभा तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करो, आणि तुम्हाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो! रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा! "

"सप्त अश्व जोडूनी रथाला, भास्कर आले अंगणी, तेजाचा हा उत्सव सजला, माघ शुद्ध सप्तमीच्या दिनी! रथसप्तमी आणि सूर्यजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! "

"जसा सूर्य अंधार चिरून जगाला प्रकाश देतो, तसाच तुमच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश पडो! रथसप्तमीच्या सर्व गणेशभक्तांना आणि सूर्यभक्तांना शुभेच्छा!"

"आरोग्यं भास्करदिच्छेत! सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा!"

"सप्त अश्व, सात रंग आणि सूर्याचे तेज... तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची होवो हेज! सूर्यदेवाच्या कृपेने तुमचे संपूर्ण वर्ष आरोग्याने उजळून निघो. रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा! "

"ज्यांच्या तेजाने चराचर सृष्टी चालते, त्या आदिनाथाला आज मनोभावे वंदन करूया! सूर्यनारायणाचे तेज तुमच्या कर्माला आणि विचारांना नवी दिशा देवो. रथसप्तमी आणि सूर्यजयंतीच्या शुभेच्छा! "

"आरोग्यं धनसंपदा! सूर्याच्या कोवळ्या किरणांनी तुमचे सौंदर्य आणि आरोग्य वृद्धिंगत व्हावे, आणि मनातील मरगळ दूर होऊन नवचैतन्य सळसळावे! रथसप्तमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

"अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा तेजाचा सण! सूर्यदेवाचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो."

English
हिंदी सारांश
Web Title : Ratha Saptami 2026: Wishes, Quotes, Status, and Celebration Guide

Web Summary : Ratha Saptami, or Surya Jayanti, marks the sun's journey, bringing light and health. Celebrated on January 25th, it signifies the transition to warmer weather and is a time for sun worship and healthy wishes.
टॅग्स :Wishes in Marathiमराठी शुभेच्छाIndian Festivalsभारतीय उत्सव-सण