Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 08:47 IST2025-08-09T08:46:28+5:302025-08-09T08:47:02+5:30
Raksha Bandhan 2025 Shubh Muhurt Time: आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी कामना करते. तर भाऊ देखील आपल्या बहिणींना आयुष्यभर संरक्षण आणि प्रेम देण्याचे वचन देतात.

Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
आज बहीण भावाला राखी बांधणार आहे. अनेकांनी शनिवार, रविवार आल्याने सुटी घेतली आहे किंवा सुटी आहे. परंतू, अख्खा दिवस रक्षा बंधनाचा नाहीय. केवळ साडे सात तासच राखी बांधण्याचा मुहूर्त आहे. या काळातच राखी बांधणे शुभ राहणार आहे. हा मुहूर्त कोणता ते जाणून घेऊया...
आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी कामना करते. तर भाऊ देखील आपल्या बहिणींना आयुष्यभर संरक्षण आणि प्रेम देण्याचे वचन देतात. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला रक्षा बंधन साजरे केले जाते.
या पौर्णिमेची यंदाची तारीख ८ ऑगस्ट होती, ही पौर्णिमा दुपारी २.१२ वाजता सुरु झाली आहे. तर ती आज ९ ऑगस्ट रोजी दुपारी १.२४ वाजेपर्यंत असणार आहे. शास्त्रांमध्ये, भद्रा काळ हा अशुभ काळ असल्याचे म्हटले आहे. ज्यामध्ये शुभ कार्ये करण्यास मनाई आहे. विशेषतः रक्षाबंधनासारख्या शुभ सणावर, भद्रा काळाच्या वेळी राखी बांधणे शुभ मानले जात नाही. हा काळ वादविवाद, अशांतता आणि अडथळा आणणारा मानला जातो.
परंतू, रक्षाबंधन भद्राच्या सावलीत राहणार नाही. भद्रा ८ ऑगस्ट रोजी दुपारी ०२.१२ ते ९ ऑगस्ट रोजी पहाटे ०१.५२ पर्यंत होते, म्हणजेच हा काळ आता संपलेला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त ९ ऑगस्ट रोजी सकाळी ०५:४७ ते दुपारी ०१:२४ पर्यंत आहे. म्हणजेच राखी बांधण्यासाठी बहीण-भावाकडे सुमारे ७ तास ३७ मिनिटांचा वेळ आहे.
बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला तीन गाठी बांधाव्यात असे म्हणतात. हा तर्क काय हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा...