शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Raksha Bandhan 2024: भावाला राखी बांधून झाल्यावर धाग्याला 'तीन'च गाठी का मारायच्या? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 07:00 IST

Raksha Bandhan 2024: राखीची सुटू नये आणि ऋणानुबंध घट्ट व्हावेत म्हणून राखीचा धागा घट्ट बांधला जातो, पण त्याला तीन गाठी मारण्याचे कारण जाणून घ्या. 

रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला तीन गाठी बांधाव्यात असे म्हणतात, त्यामागे काय तर्क आहे तो जाणून घेऊ.

राखी बांधताना बहिणी आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाट मांडतात. पाटाखाली व पाटासभोवती रांगोळी काढतात. पाटावर आसन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात. त्याला गंध, अक्षता लावतात आणि सोन्याच्या अंगठीने किंवा दोन सुपाऱ्यांनी औक्षण करतात. त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन घेतात.

राखीला तीन गाठी :

राखी सुटू नये म्हणून बहिणी राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात. पण काही जण त्याजागी तीन गाठी बांधतात. या तीन गाठींचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो. या तीन गाठी ब्रह्मा, विष्णू, महेशाला स्मरून बांधल्या जातात. या जगाचा सांभाळ हे त्रिदेव करतात, त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे, त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचे स्मरण करून तीन गाठी बांधाव्यात असे सांगितले जाते.

त्यासोबतच जोडला जातो आणखी एक तर्क :

असे मानले जाते की मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध या पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशीसुद्धा असतो. राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते.

यंदाचा रक्षाबंधन मुहूर्त 

यंदा, सोमवार १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा, १८ ऑगस्ट २०२४ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होते. तर १९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रौ ११ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होते. रक्षाबंधनात विधिवत, शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे. यंदाच्या राखीपौर्णिमेला भद्रा योग आहे. भद्राकाळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्ये भद्राकालात करू नयेत, असे म्हटले जाते. पण, महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. तसेच भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असे जे म्हटले जाते, त्यात काहीही तथ्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनAstrologyफलज्योतिषPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Shravan Specialश्रावण स्पेशल