शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

Putrada Ekadashi 2025: वर्षातून दोनदा येते पुत्रदा एकादशी; काय आहेत याचे व्रतलाभ? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 07:05 IST

Putrada Ekadashi 2025: संतानप्राप्तीसाठी पुत्रदा एकदशीचे व्रत वर्षातून दोनदा म्हणजेच पौषात आणि श्रावणात केले जाते, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

श्रावण शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi 2025) असे म्हणतात. ५ ऑगस्ट रोजी ही एकादशी आहे. वर्षभरातील इतर इतर एकादशीप्रमाणे या एकादशीलाही कथेचा संदर्भ जोडलेला आहे. यादिवशी व्रत कर्त्याने उपवास करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा करावी, असे म्हटले जाते. संतान प्राप्तीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी वर्षातून दोनदा हे व्रत केले जाते, एक पौष शुध्द एकादशीला आणि दुसरे श्रावण शुद्ध एकादशीला!

एकादशी हे व्रत भगवान विष्णूंसाठी केले जाते. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला विशिष्ट नाव आणि हेतू दिलेला आहे. जेणेकरून तो हेतू साध्य होण्यासाठी का होईना भाविकांनी एकादशीचे व्रत करावे, हा उद्देश असू शकेल. नावावरूनच या एकादशीचे महत्त्व आपल्याला लक्षात येते. ते म्हणजे एकादशीचे हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी केले जाते. ते कसे करतात व त्यामागील कथा काय आहे ते पाहू.

पुत्रदा एकादशीची कथा :

कांचनपूरचा राजा शूरसेन हा प्रजापालनदक्ष, पुण्यवान आणि पराक्रमी होता. त्याला शंभर राण्या होत्या परंतु पुत्रसौख्य नव्हते. ऋषिमुनींना त्याने आपले दु:खं सांगितल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्याने हे व्रत केले, त्यायोगे त्याची वंशवेल बहरली.

आजच्या विज्ञानयुगात अशा कथांवर लोकांचा कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु आज वैद्यकीय क्षेत्रातील उपचारांमुळे अनेकांना संतानप्राप्तीचे सुख प्राप्त होत आहे, त्याप्रमाणे पुराणकाळातील तपस्वी ऋषिमुनींनादेखील ही विद्या अवगत असू शकेल यावर विश्वास ठेवण्यास काहीच हरकत नाही. एखादी गोष्ट जेव्हा श्रद्धेने केली जाते, तिचे फळ निश्चित मिळते. 

एकादशीचे व्रत विष्णूभक्तीसाठी आहेच, शिवाय ते आरोग्यासाठीही हितकारक आहे. म्हणून दर महिन्यातून दोन एकादशीला हे व्रत केले जाते. एकादशीचा उपास हा दोन्ही वेळ करणे अपेक्षित असते. त्यादिवशी केवळ फलाहार करावा आणि देवाचे नामस्मरण करून, दर्शन घेऊन देह व चित्त शुद्ध करावे, असा एकादशीचा हेतू असतो. त्यानुसार पुत्रदा एकादशीचे व्रत करावयाचे असेल तर व्रत विधी पुढीलप्रमाणे आहे.

पुत्रदा एकादशीचा व्रतविधी :

हे व्रत करण्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला दुपारी जेवून एकभुक्त राहावे. एकादशीच्या दिवशी स्नानविधी करून परमेश्वराची पूजा करावी. फुले ले, फळे, नैवेद्य अर्पण करून आरती करावी. देवदर्शन घ्यावे. रात्री कथा, कीर्तन, पारायण करावे. दुसऱ्या दिवशी स्नान, पूजा करून गरजूंना तसेच पुरोहितांना दान दक्षिणा देऊन मग स्वत: जेवावे. हे व्रत केल्याने पाप नाश होऊन संतानप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलekadashiएकादशीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण